नांदेड दि.२० : तब्बल पाचशे वर्षाच्या बहुप्रतीक्षेनंतर आयोजित प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आज दिनांक 22 जानेवारी रोजी होत असून या निमित्त आयोध्यातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा चलचित्रद्वारे प्रत्यक्ष पाहता यावे यासाठी या सोहळ्याचे आयोजितेतील थेट प्रक्षेपण श्रीक्षेत्र काळेश्वर येथे आयोजित करण्यात आले आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांनी राम भक्तांसाठी ही पर्वणी आयोजित केली आहे. त्यानंतर आरती आणि महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे.
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांच्या आयोध्या नगरीत राम मंदिरात राममूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करता यावी यासाठी तब्बल पाच शतकापासून हिंदू धर्मियांचा संघर्ष सुरू होता . 76 वेळा लढे उभारण्यात आले . असंख्य कारसेवकांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले .रक्त सांडले. आहुती दिली . आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून आयोध्यातील राम मंदिर उभारणीसाठी प्राण त्याग केला. त्यानंतर हिंदू धर्म रक्षक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागला आणि येथे भव्य दिव्य असे राम मंदिर उभे राहिले आहे. या भव्य दिव्य राम मंदिरात प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना दिनांक 22 जानेवारी रोजी करण्यात येणार असून येथील सोहळ्याचे थेट प्रक्षेपण नांदेडच्या रामभक्तांना पाहता यावा यासाठी श्रीक्षेत्र काळेश्वर विष्णुपुरी येथे मोठ्या स्क्रीनवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. याचवेळी भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून रामभक्तांसाठी दुपारी बारा वाजता महाआरती आणि महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे. रामभक्तांनी मोठ्या संख्येने या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक तथा भाजपा जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांनी केले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड