प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत बगल देण्याच कार्य सुरूच.
तुषार कांबळे / हदगाव प्रतिनिधी
हदगाव तालुक्यातील मौजे हडसनी येथे सुभाष साखर कारखाना आहे. हा कारखाना माजीमंत्री सूर्यकांताताई पाटील यांच्या काळापासून आहे परंतु आता सुभाष साखर कारखान्याने हद्द बांधण्यास सुरुवात केली असून हडसनी येथील गावकरी यांनी या हद्दीला विरोध दर्शविला आहे. त्यांचे म्हणणे आहे की सुभाष साखर कारखाना हा गायरान जमिनीवर अतिक्रमण करत आहे ती जमीन ही गावच्या हितासाठी वापरण्यासाठी आहे, जनावर चारण्यासाठी आहे परंतु कारखाना हे आमच्या गायरान जमिनीवर अतिक्रमण करत असून आमच्या गावापासून कारखाना हा दोन किलोमीटर आहे परंतु कारखान्याने पूर्ण हद्द गावालगत येऊन थांबवली हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यावेळी गावचे युवा सेना जिल्हाप्रमुख संदेश पाटील हडसनीकर यांनी त्यांच्या विरोधात आवाज उठवत हदगाव तहसीलचे तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे लिखित तक्रार दाखल केली असून तालुक्याचे तहसीलदार यांनी काम थांबवण्यास लेखी स्वरूपात आदेश दिला असून त्या आदेशाला केराची टोपली दाखवीत बगल देत काम चालूच आहे. त्यामुळे सदरील गावकरी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे यामध्ये महिला व पुरुष आक्रमक झाल्याचे मोठ्या प्रमाणात दिसून येते.

गावकऱ्यांच्या समस्या :
गायरान जमीन ही आमच्या हक्काची असून आम्ही कारखान्याला घशात घालू देणार नाही असा संतप्त सवाल संदेश पाटील हडसणीकर यांनी केला आहे.
गावकरी व महिलांचे असे म्हणणे आहे की गायरान जमिनीवर पूर्वीपासून महादेव मंदिर बौद्ध संस्थान भूमी व तलाव आहेत आमची गायरान जमीन ही महादेव मंदिर हे पूर्वीपासून आहे येथे कारखाना सुद्धा नव्हता केव्हा आमचे महादेव मंदिर, स्मशानभूमी व तलाव होता परंतु कारखाना हे साम, दाम, दंड, भेद वापरून आमच्या गायरान जमिनीवर अतिक्रमण करत आहे त्यामुळे आमच्या घराच्या भिंती पडत आहेत. यावर प्रशासनाने काम रोखून आमची गायरान जमीन आम्हाला परत गावच्या ताब्यात देण्यात यावी….



## सत्यप्रभा न्यूज नांदेड ##












