मुखेड दि.१ नाव्हेंबर: जांब (बु): जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून जांब गटात जयपाल गायकवाड यांचे नाव जोरदार चर्चेत आले आहे. गायकवाड यांनी अलीकडेच हिप्परगा, दापका राजा आणि लादगा येथे घेतलेल्या संवाद दौऱ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्थानिक युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचे स्वागत करत काँग्रेसला पाठिंबा दर्शविला. जांब गट हा अनुसूचित जातीसाठी राखीव असून, या वेळी स्थानिक उमेदवाराचा मुद्दा ठळक झाला आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार हनमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी स्थानिक पातळीवरून उमेदवारीसाठी नावे मागवली होती, त्यात उच्चशिक्षित आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत जयपाल गायकवाड यांचे नाव पुढे आले आहे.
गायकवाड यांच्या संपर्क दौऱ्यांना वाढता प्रतिसाद मिळत असून, स्थानिक युवा चेहरा आणि प्रामाणिक प्रतिमा या बळावर काँग्रेसला जांब गटात गती मिळाल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे, भाजप व इतर पक्षांचे उमेदवार अद्याप निश्चित झालेले नाहीत. त्यामुळे गायकवाड यांच्या प्रचाराला जांब गटात सुरुवातीपासूनच वेग आला आहे.











