• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Tuesday, March 3, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

अति आवश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

29 August 2025
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image 1968279682 1756463594470
32
SHARES
214
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात प्रशासनाच्यावतीने योग्य ती खबरदारी घेवून बचावकार्य सुरु

नांदेड दि. २९  ऑगस्ट :- नांदेड जिल्ह्यामध्ये कालपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नदी, नाल्यांना पूर आला आहे. तसेच नांदेड शहरात काल रात्रीपासून झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी शिरले आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल, एसडीआरएफ, सीआरपीएफ, नांदेड मनपा व स्थानिक शोध व बचाव पथकाच्या माध्यमातून शोध व बचाव कार्य युध्द पातळीवर सुरु आहे.
पूर परिस्थिती नियंत्रणात आहे.
प्रशासनकडून योग्य ती खबरदारी घेतली जात असून सर्व यंत्रणासोबत संपर्क व समन्वय ठेवून जिल्हा प्रशासनाची कार्यवाही सुरु आहे. या परिस्थितीत नागरिकांनी अति आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

नांदेड येथील पुरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील भारतीय सैन्य दलाच्या बटालीयनला बोलाविले आहे. तात्पुरते स्थलांतरीत नागरिकांना आवश्यक ती मदत करण्यात येत असून, कालपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आज शुक्रवार 29 ऑगस्ट रोजी सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

नांदेड जिल्ह्यातील एकूण 93 मंडळापैकी 69 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. सर्वाधिक पावसाची नोंद कंधार मंडळ व माळाकोळी मंडळ (लोहा) मध्ये प्रत्येकी 284.50 मि.मि. नोंदविली आहे.

तालुकानिहाय अतिवृष्टी झालेली मंडळे- नांदेड 07, बिलोली-06,मुखेड-08, कंधार -07, लोहा-06, हदगांव-05, भोकर-04, देगलूर-05, किनवट-01, मुदखेड-03, हिमायतनगर-01, धर्माबाद-04, उमरी-04, अर्धापूर-03, नायगांव-05 मंडळात अतिवृष्टी नोंद झाली आहे. जिल्ह्यातील 13 तालुक्याच्या पर्जन्यमान हे 65.00 मि.मि. पेक्षा जास्त असून, त्यापैकी 11 तालुक्याचे पर्जन्यमान हे 100.00 मि.मि. पेक्षा जास्त आहे. जिल्ह्यातील गोदावरी, मानार, मांजरा, लेंडी, या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे या नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. तेलंगाना राज्यात मुसळधार पाऊस सुरु असून पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी निजामसागर, पोचमपाड या धरणातील बॅक वॉटर व विसर्गामुळे बिलोली, देगलूर, धर्माबाद व मुखेड तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यत एकूण 5 हजारहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. एसडीआरएफ, सीआरपीएफ, स्थानिक पोलीस व स्थानिक प्रशासनाच्या मदतीने आपत्तीग्रस्त लोकांना हलविण्यात आले आहे. सद्यस्थितीत परिस्थिती नियंत्रणात आहे.

अतिवृष्टी झाल्यामुळे जिल्ह्यातील 3 तलाव फुटल्याने शेती पिकांचे नुकसान झाले आहे. आतापर्यत एकूण 3 व्यक्ती नैसर्गिक आपत्तीकारणाने मयत असून 01 व्यक्ती बेपत्ता असून त्याचा शोध चालू आहे. यामध्ये नायगाव तालुक्यातील 1 इसम, उमरी तालुक्यातील रेल्वे विभागातील कार्यरत 1 रेल्वे स्टेशन अधिक्षक यांचा मृत्यू, किनवट तालुक्यात विज पडून 1 व्यक्तीचा मृत्यू तर किनवट येथील एक व्यक्ती बेपत्ता आहे.

नांदेड जिल्ह्याला प्रभावीत करणारे धरण, लघु, मध्यम प्रकल्प, बॅरीकेज स्थिती
• उर्ध्व पेनगंगा प्रकल्प- ईसापूर टक्केवारी, 5 दरवाजे उघडले असून विसर्ग 8 हजार 313 क्युसेस आहे.
• येलदरी धरण ता. जिंतूर जि. हिंगोली-येलदरी धरणाच्या उर्ध्व बाजुने आवक कमी झाली असल्याने आज सकाळी 7 वाजता येलदरी धरणाचे गेट क्र. 5 व 6 बंद करण्यात आले आहेत. गेट क्र.01 व 10 हे 0.5 मी. ने चालू असून 4 हजार 219.94 क्युसेस (119.496 क्युमेकस) इतका विसर्ग पूर्णा नदीपात्रात चालू आहे. स्पीलवे गेटमुळे पुर्णा नदीपात्रात स्पीलवे गेट-4 हजार 220 +हायड्रोपावर 2 हजार 700 क्युसेस असा एकूण 6 हजार 920 क्युसेस (196 क्युमेकस) विसर्ग सुरू आहे.
• सिध्देश्वर धरण ता. औंढा जि. हिंगोली- 343.792 क्युमेकस /12141 क्युसेस.
• शंकरराव चव्हाण विष्णुपूरी प्रकल्प- 10 दरवाजे उघडले असून विसर्ग 119,008 क्युसेस .
• बळेगाव उच्च पातळी बंधारा ता. उमरी जि. नांदेड- सर्व 16 दरवाजे उघडले असून विसर्ग 5 हजार 97 क्युमेक्स आहे. बंधाऱ्याच्या उर्ध्व बाजूच्या विष्णुपूरी प्रकल्पातून 2 हजार 880 क्युसेस विसर्ग सुरु. सद्यस्थितीत बंधाऱ्याची पातळी 345 मी (FRL-342m) इतकी असून पाण्याची आवक पाहता अजून वाढण्याची शक्यता आहे.
• निजामसागर प्रकल्प- या प्रकल्पाचे 23 गेट उघडले असून एकूण ओव्हर फ्लो 1,67,541 क्युसेस आहे.
• अपर मानार प्रोजेक्ट, लिंबोटी- सकाळी 5.30 वाजता 12 दरवाजे 1.5 m व 3 दरवाजे 2 m ने चालु केले असून 2065 क्युमेकस (72275क्युसेस) विसर्ग सुरु आहे.
अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी किरण अंबेकर यांनी दिली आहे.
000000

Previous Post

अतिवृष्टीने प्रभावित झालेली वीज व्यवस्था सुरळीत करण्यासाठी वीज कर्मचारी प्रयत्नशील

Next Post

मो. शकील अ.करीम यांनी केलेल्या अनियमितता व भ्रष्टाचाराची चौकशी करावी – डॉ.महेश मगर

Next Post
image editor output image 748037930 1756481329760

मो. शकील अ.करीम यांनी केलेल्या अनियमितता व भ्रष्टाचाराची चौकशी करावी – डॉ.महेश मगर

Stay Connected

  • 327k Fans
  • 1.7k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    The Instagram Access Token is expired, Go to the Customizer > JNews : Social, Like & View > Instagram Feed Setting, to refresh it.
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10278
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

7806
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6404
image editor output image372790316 1704806870229

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान
शाळांना मिळणार लाखोंची बक्षिसे

280
Hadsani News

प्रशासनाचा आदेश धाब्यावर! हडसणीत साखर कारखान्याकडून गायरान जमिनीवर डल्ला; तहसीलदारांच्या स्थगितीनंतरही भिंतीचे काम सुरूच

2 March 2026
Hadgaon News

हडसणीतील गायरान जमिनीवरील अतिक्रमणाविरोधात ‘परिवर्तन’चा एल्गार; तहसीलदारांकडे अधिकृत तक्रार दाखल

28 February 2026
image editor output image 663345551 1772088599085

महावितरण अधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळे जानेफळ येथील रोहित्र अग्नीच्या विळाख्यात.

26 February 2026
Rohit Pawar

Rohit Pawar: अजितदादांना न्याय मिळेल का? अशी शंका…:रोहित पवार

25 February 2026

Recent News

Hadsani News

प्रशासनाचा आदेश धाब्यावर! हडसणीत साखर कारखान्याकडून गायरान जमिनीवर डल्ला; तहसीलदारांच्या स्थगितीनंतरही भिंतीचे काम सुरूच

2 March 2026
Hadgaon News

हडसणीतील गायरान जमिनीवरील अतिक्रमणाविरोधात ‘परिवर्तन’चा एल्गार; तहसीलदारांकडे अधिकृत तक्रार दाखल

28 February 2026
image editor output image 663345551 1772088599085

महावितरण अधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळे जानेफळ येथील रोहित्र अग्नीच्या विळाख्यात.

26 February 2026
Rohit Pawar

Rohit Pawar: अजितदादांना न्याय मिळेल का? अशी शंका…:रोहित पवार

25 February 2026

Satyapabha News…

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Hadsani News

प्रशासनाचा आदेश धाब्यावर! हडसणीत साखर कारखान्याकडून गायरान जमिनीवर डल्ला; तहसीलदारांच्या स्थगितीनंतरही भिंतीचे काम सुरूच

2 March 2026
Hadgaon News

हडसणीतील गायरान जमिनीवरील अतिक्रमणाविरोधात ‘परिवर्तन’चा एल्गार; तहसीलदारांकडे अधिकृत तक्रार दाखल

28 February 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज