अमित देसाई
ठाणे दि.२१: भाजपात तिकीट मागण्याचा सर्वांनाच अधिकार आहे, पण तिकीट जाहीर झाल्यानंतर कोणी बंडखोरी करेल अशी परिस्थिती भाजपात नसल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, पुण्यात बावनकुळे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची शाळा घेतलीयं. यावेळी भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, या बैठकीला भाजपचे नेते अमोल बालवडकर, श्रीनाथ भिमाले यांनी दांडी मारल्याने एकच चर्चा सुरु झाली.
#सत्यप्रभा न्यूज #ठाणे













