हदगाव प्रतिनिधी | हादगाव तालुक्यातील (Hadgaon News) मौजे लिंगापूर येथे बळीराजा शेतकरी सन्मान सोहळा 2025 – 26 मध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या शेतकरी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बांधव यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये सत्यप्रभा न्यूजचे तालुका प्रतिनिधी तुषार कांबळे (Tushar Kamble) यांना “समाज भूषण” पुरस्कार (Samaj Bhushan Award) देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांची प्रश्न , त्यांच्या व्यथा शासन दरबारी मांडून अनेक शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. 2022 मध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी उल्लेखनीय कार्य करून 19 शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला त्यासाठी त्यांना हदगाव तालुक्यातील मौजे लिंगापूर येथे बळीराजा शेतकरी सन्मान सोहळा 2025 – 26 चा समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाची अध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष (स्वराज पक्ष संघटना), उद्घाटक म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी डी आर रणवीर, युवा सेना सरचिटणीस अंकुश पाटील देवसरकर विविध क्षेत्रातील मान्यवर व सत्कारमूर्ती सटवाजी पवार (गुरुजी), सविता ताई निमडगे , पत्रकार प्रभाकर दहिभाते , पत्रकार तुषार कांबळे, पत्रकार दीपक सूर्यवंशी , पत्रकार मारुती काकडे , पत्रकार महेंद्र धोंगडे , पत्रकार शिवाजी खुने, पत्रकार सखाराम खांडेकर, पत्रकार भगवान कदम , आणि अनेक शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन अभिजीत पाटील देवसरकर यांनी केले होते.