नांदेड दि.१९जुलै : समाजाच्या बौद्धिक समृद्धीचा उत्सव साजरा करताना नव्या पिढीच्या प्रज्ञेचा गौरव हा सगळ्यांच्याच मनाला आनंद देणारा क्षण असतो. प्रज्ञा जागृती मिशनच्या वतीने सोमवार, २८ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता, मारवाडी धर्मशाळा, साथी बालाराम यादव नगर, वझीराबाद, नांदेड येथे गवळी समाजातील सुमारे १०० प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
या समारंभात नांदेड जिल्ह्याचे जनप्रिय पोलिस अधीक्षक मा. श्री. अभिनाश कुमार सर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. सामाजिक शिस्त, सकारात्मक बदल आणि प्रभावी प्रशासन यांचा समतोल राखत त्यांनी नांदेड जिल्ह्याच्या प्रगतीस मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ समाजातील युवकांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरणार आहे.
तसेच या कार्यक्रमात आणखी एक मान्यवर व्यक्तीमत्व मार्गदर्शनासाठी लाभत आहे – दिक्षा अॅकेडमीचे संस्थापक श्री. लक्ष्मीशंकर यादव सर. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना , NEET, JEE यांसारख्या आव्हानात्मक परीक्षांमध्ये घडवून त्यांच्या यशात मोलाची भूमिका बजावणारे यादव सर, आपल्या प्रभावी शैलीत नव्या पिढीला प्रेरणा देतील, यात शंका नाही.
या समारंभात शिक्षण, क्रीडा, कला, संस्कृती व इतर क्षेत्रांमध्ये उज्वल यश संपादन करणाऱ्या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. हा गौरव समाजाच्या सामूहिक उन्नतीचा प्रतीक ठरणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रज्ञा जागृती मिशनचे कार्यकर्ते एकजुटीने मेहनत घेत आहेत. यामध्ये गोकुल यादव, डॉ. संतोष मंडले, बिरबल यादव, सुशांत यादव, अॅड. ऋषी यादव, अमोल चौधरी, गौरव यादव, योगेश रौत्रे, दिनेश रौत्रे, महेश यादव, गोविंद मंडले, राजेश गवळी, ईश्वर यादव, दर्शन फतेलष्करी, मयूर परीवाले, सुनील लुले, भावेश यादव यांचा विशेष सहभाग आहे.
तसेच यादव महासभेचे बिशनकुमार शामलाल यादव, नरसिंग गुम्मनलाल मंडले, राधाकिशन लक्ष्मणजी यादव, गजानन भानुदास यादव (न्यायाधीश, गंगाखेड), तुलजेश गणेशलाल यादव, किशोर किशनलाल यादव, धीरज ईश्वरलाल यादव (सर्व माजी नगरसेवक, नांदेड म.न.पा.), गणेशलाल किशनलाल भातावाले, गोपाल घनश्याम फत्तेलष्करी, भारत शामलाल यादव, सुंदरलाल प्रभुलाल भातावाले, विनय बाबूलाल यादव, स्वराज संजय यादव यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.
प्रज्ञा जागृती मिशनचे सचिव गगन लालामन यादव व कार्यक्रम संचालक डॉ. (प्रा.) कैलाश भानुदास यादव यांनी समाजातील सर्व बांधवांना भावनिक आवाहन केले आहे की, “या अद्वितीय सन्मान सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवा आणि त्यांच्या यशाचा भाग व्हा.” आणि या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार व्हावे
माननीय संपादक महोदय,
सोबत पाठवलेली बातमी आपल्या प्रतिष्ठित दैनिक, साप्ताहिक, मासिक, नियतकालिक तसेच वेब पोर्टलसारख्या माध्यमांत प्रसिद्ध करून आम्हाला उपकृत करावे, ही नम्र विनंती.”
आपला
डॉ. कैलाश भानुदास यादव
वजिराबाद नांदेड़
संपर्क ९४२०६६८८८६