काही दिवसांपुर्वी लाखांची भरारी घेणा-या सोन्याने दर(Gold Rate) आता घसरले आहेत. सोन्याचे दर तब्बल 8 हजारांनी खाली आले आहेत. ऐन लग्नसराईत सोनं 8 हजारांनी स्वस्त झाल्याने सराफा बाजार पुन्हा गजबजला आहे.
गेल्या 15 दिवसांपुर्वी सोन्याच्या दराने भाववाढीचा उच्चांक गाठत थेट लाखाच्या पार आणि सामान्यांच्या आवाक्याबाहेरही गेलं होतं. ऐतिहासिक भाववाढ झालेल्या सोन्याचे दर आता मात्र घसरले आहेत. सोनं थोड थोडकं नाही तर तब्बल 8 हजारांनी स्वस्त झालं आहे. टॅरिफ वॉर निवळल्याने आणि जागतिक तणाव, अस्थिरता कमी झाल्याने सोन्यातील गुंतवणूक कमी झालीय आहे. आणि यामुळेच आता सोन्याचे दर कमी झाले आहेत. 15 दिवसात सोन्याची किंमत तोळ्यामागं तब्बल 8 हजार रुपयांनी खाली आली आहे.
गेल्या पंधरवड्यात सोन्याने उच्चांकी उसळी घेतली. आंतरराष्ट्रीय बाजारतील अस्थिर वातावरणामुळे सोन्याने लाखाचा टप्पा ओलांडला आहे. पण आता मात्र सोन्यात 8 हजारांची घसरण झाल्याने समाधान व्यक्त केलं जात आहे. 21 एप्रिलला सोन्याने 1 लाखाचा टप्पा गाठला होता. त्यानंतर दरात मोठी घसरण झालीच नाही. आता मात्र सोनं 8 हजारांनी कमी झालं आहे.
8 हजार रुपयांच्या घसरणीनंतर आज सोन्याचे दर 92 हजार रुपये तोळ्यावर आले आहेत. तर जीएसटीसह दर 96 हजार 600 रुपये प्रति तोळे आहे. सोन्याच्या दरात एवढा मोठा चढउतार होत असल्यानं सोनं खरेदी करावं की आणखी वाट पाहावी या द्विधा मनस्थितीत ग्राहक आहे.