दिव्यांग संघटनेच्या वतीने राज्य शासनाचे आभार, फटाके फोडून
पेढे भरून केला आनंदोत्सव साजरा
नांदेड दि.१९ जुलै: सकल दिव्यांग संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने विविध मागण्यासाठी आंदोलने मोर्चे काढून जिल्हाधिकारी. खासदार. आमदार .मंत्री. व पावसाळी अधिवेशनावर मोर्चा काढल्यानंतर राज्य शासनाने मानधनांमध्ये एक हजार रुपयांची वाढ केल्याने राज्य शासनाचा सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ फटाके फोडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
दिव्यांगांना चांगल्या प्रकारे जीवन जगता यावे त्याला जगण्यासाठी आधार मिळावा यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते परंतु त्यामध्ये स्थानिक आमदार.खासदार व अधिकारी हे निधी योग्यरित्या खर्च करत नसल्यामुळे अनेक दिव्यांगांना जगण्यास बळ मिळत नाही. त्यांना उद्योगासाठी आधार मिळावा कुटुंब चालवण्यासाठी रोजगार मिळावा यासाठी राज्य शासन व केंद्र शासन आर्थिक मदतीची तरतूद करत असते यासाठी सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने विविध मागण्यासाठी मागील बऱ्याच दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालय. माजी मुख्यमंत्री.दिव्यांग मंत्री. आमदार. खासदार यांच्या घरावर मोर्चे काढून आंदोलन करण्यात आले त्याचबरोबर पावसाळी अधिवेशन मुंबई येथे सकल दिव्यांग संघटना महाराष्ट्राच्या वतीने गनिमीकाव्याने भव्य मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. त्या ठिकाणी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी दिव्यांग मंत्री अतुल सावे यांची भेट घडवून देत तातडीची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत तासभर सविस्तर चर्चा करून सावे यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनाची दखल राज्य शासनाने घेतली व संजय गांधी निराधार योजनेमध्ये एक हजार रुपयांची त्वरित वाढ करून दिव्यांगांना आधार दिला आहे.
त्याबद्दल राज्य शासनाचे सर्व दिव्यांग बांधव आणि भगिनींच्या वतीने आभार मानून शनिवार दिनांक 19 जुलै 2025 रोजी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवून राज्य शासनाचे आभार मानून आनंद व्यक्त केला आहे. या आनंदामध्ये वजीराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी दिव्यांगांना पेढे भरवून शाल श्रीफळ हार घालून अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आणि उपस्थित सर्व दिव्यांगांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले या ओव्या गावून आपले मनोगत व्यक्त करत पोलिस प्रशासन सदैव आपल्या पाठिशी असल्याची ग्वाही दिली. यावेळी सकल दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे. चंपतराव डाकोरे. आदित्य पाटील. व्यंकट कदम.रवि कोकरे,सुनिल जाधव, सय्यद आरिफ.नारायण नवले. कार्तिकुमार भरतीपुरम.आतिक हुसेन, शेख आलिम,शेख मुबीन, महंमद मोसिन, प्रशांत हणमंते,शेख माजिद,शेख ताज.शेख हसन, सुनिल कांबळे,नारलावार सावकार, शेख मतिन,शेख सिराज.राजु इराबत्तीन, शेख माजिद शेख चांद,किरणकुमार न्यालापल्ली,शेख सलिम, अफरोजा खानम, भाग्यश्री नागेश्वर, कल्पना सकते,सविता गवते, शिंदेबाई,सरोज नारलावार,यांच्यासह मुकबधीर-कर्णबधिर संघटनेसह सकल दिव्यांग बांधव भगिनी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.