Gunaratna Sadavarte On Raj Thackeray: मनसे आणि महाविकास आघाडीचा 1 नोव्हेंबर रोजी मोर्चा निघणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यासंदर्भात मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. बॉसला कानशिलात लगावा असे मिश्किल विधान यावेळी राज ठाकरेंनी केले होते. यावर गुणरत्न सदावर्ते यांनी तिखट प्रतिक्रिया दिलीय.
EVM मधून होणाऱ्या घोटाळ्याच्या विरोधात 1 तारखेचा मोर्चा दणदणीत मोर्चा झाला पाहिजे. दिल्लीपर्यंत आवाज गेला पाहिजे.महाराष्ट्रात काय प्रकारचा राग आहे ते तुम्ही या मोर्चातून दाखवा. तो व्यक्त करण्यासाठी तुम्हाला तिकडे यावं लागेल. आज नोकरी होती. बॉसने नाही सांगितलं. बॉसला मारा. शनिवारपुरतं एक मत त्याच्या गालावर द्या. मला असं वाटतं तुमचा बॉसदेखील मतदारच आहे. त्यालाही मोर्चात घेऊन या”, अशी मिश्किल टीपणी राज ठाकरेंनी केली होती.
महाराष्ट्रासह देशात मतदाराचा अपमान सुरुय. मतदार उन्हातान्हात रांगेत उभा राहतो. त्याच्या मताचा तो अपमान आहे. हे सर्व वेळीच सुधारलं पाहिजे. हे सगळं नीट झालं पाहिजे. देशातील निवडणुका पारदर्शकपणे झाल्या पाहिजेत, अशी मागणी यावेळी राज ठाकरेंनी केली. सर्व पुढारलेल्या देशात आजही बॅलेट पेपरवर मतदान होतात. 3-4 देशात वोटींग मशीन वापरलं जातं. तेही आफ्रिकेत. पण सगळ्या देशांत बॅलेट पेपर वापरला जातो, असे राज ठाकरे म्हणाले.
उद्याचा मोर्चा लबाडांचा मोर्चा आहे. नोकरीसाठी मोर्चा नाहीय. गुलाबी मोर्चा आहे. राजकारण तापवण्यासाठी तुम्ही लोकांना तसेच तिन्ही यंत्रणांना वेठीस धरु शकत नाही. हिंसक वृत्ती दाखवा, व्यापाऱ्यांना कशाप्रकारे मारा हे त्यांनी सांकेतिक भाषेत सांगितले. व्यापाऱ्यांना मारहाण झाली, कर्मचाऱ्यांची नोकरी गेली तर कोण जबाबदारी घेणार? असा प्रश्न गुणरत्न सदावर्ते यांनी केला.
आपण राजकीयदृष्ट्या पराभूत होणार, आपली माती होणार आहे, हे राज ठाकरेंना माहिती आहे. लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. जरांगेच्यावेळी मुंबईने भोगलं. ही दुसरी आवृत्ती आहे का? असा प्रश्न सदावर्तेंनी विचारला. सुप्रीम कोर्टानेही अशा कृत्यांवर बंदी आणलीय. राज आणि उद्धव ठाकरे कायद्यापेक्षा मोठे नाहीत. ते मुंबईच्या लाईफलाईनला धोका पोहोचवताय, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले.