तुषार कांबळे ! हदगाव प्रतिनिधी | हदगाव शहरातील सध्या अवैध मटका व गुटखा दारू व्यवसायाने चांगलीच गती घेतली आहेत. अनेकांचे संसार उध्वस्त करणारा वरळी मटका जुगार हा अवैध व्यवसाय तातडीने बंद करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे शहर मंडळ उपाध्यक्ष रसूल भाई कुरेशी यांनी केली . याबाबत त्यांनी निवेदनाची प्रतिलिपी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार . जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना दिले.
याप्रसंगी रसूल कुरेशी म्हणाले की. नांदेड जिल्ह्यातील सर्वात मागासलेला तालुका म्हणून हदगाव ची ओळख त्यात ओला दुष्काळाचे सावट असून सुद्धा गेल्या अनेक दिवसापासून हदगाव शहर व तालुक्यातील अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणे फोफावली आहे. विशेष बाब हदगाव पोलीस स्टेशनच्या हक्के वर काही १०० फूट अंतरावर आठवडी बाजार बौद्ध विहार परिसरातील टिन शेड उभारून मटका अड्डे कार्यरत आहेत. शहराला सध्या अवैध धंद्यांचा विळखा पडलेला आहे.

गेले काही दिवसांमध्ये पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लॅश आउट च्या माध्यमातून नांदेड जिल्हा अवैध धंदे मुक्त करण्याचा संकल्प हाती घेतला होता. परंतु हदगाव पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांना आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. तसेच किराणा व पान टपरी येथे खुलेआम गुटखा विक्री होत आहे. हदगाव शहरात अनेक ठिकाणी मटक्याचे दुकाने काही लोकांनी खुलेआम चालू केले आहे निर्व्यसनी मुले व पौड माणसे अवैध धंद्यांचे शिकार होत आहेत. या मटक्या व गुटख्यामुळे अनेक लोकांचे संसार उध्वस्त होत आहेत अनेक दारुडे रस्त्यावर उभे राहून दारू पितात येणारे जाणारे नागरिकांना त्यांचा फार त्रास करावा लागत आहे. हदगाव शहरातील मटक्याचे दुकाने व गुटख्याचे दुकाने बंद करावी व त्या लोकांवर कठोर कार्यवाही करावी अशी जनतेची मागणी आहे. तसेच २ ऑक्टोबर पर्यंत आपण हे अवैध धंदे आपण बंद नाही केले तर लोकशाही अहिंसक पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी निवेदनात नमूद केला आहे,