निलेश गायकवाड | तुषार कांबळे | हदगाव : हदगाव तालुक्यातील मौजे हडसणी येथे सार्वजनिक गायरान जमिनीवर साखर कारखान्याने अनधिकृतपणे अतिक्रमण केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, माननीय तहसीलदारांनी या कामाला स्थगिती दिली असतानाही, प्रशासकीय आदेशाला केराची टोपली दाखवत कारखान्याने अतिक्रमणाची भिंत उभारली आहे. या प्रकारामुळे हदसणीतील ग्रामस्थ आक्रमक झाले असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.













