Satyaprabha News : जर तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे (CM Majhi Ladki Bahin Yojana) जुलै आणि ऑगस्ट, सप्टेंबर महिन्याचे हप्ते मिळाले नसतील, तर प्रथम अधिकृत पोर्टल किंवा अधिकृत अॅपवर तुमची योजनेची स्थिती तपासा. लाडकी बहिण योजनेचे नेमके लाभार्थी किती आहेत याची आकडेवारी अधिकृतपणे उपलब्ध नाही, कारण योजनेची अंमलबजावणी होत असताना अनेक लाभार्थी अपात्र ठरले आहेत. तथापि, योजनेच्या सुरुवातीला २ कोटी ५२ लाख महिला या योजनेअंतर्गत पात्र होत्या, त्यापैकी सुमारे २६.३४ लाख महिला अपात्र ठरल्याचे एका अहवालात नमूद केले आहे. (Ladki Bahin Yojana)
काय करावे लागेल?
तुमची लाडकी बहीण योजनेची स्थिती तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइट किंवा नारीशक्ती दूत अॅप वापरा. तिथे तुमचा अर्ज प्रलंबित आहे, मंजूर झाला आहे की नाकारला गेला आहे हे तपासा. आणि KYC करा. ( KYC करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या https://ladakibahin.maharashtra.gov.in/ )
📱 KYC करत असतांना ओटीपी प्राप्त होत नसल्याची समस्या येत असेल तर…:
▪ दररोज 2 कोटी ५२ लाख पेक्षा अधिक लाभार्थी या वेबसाइटवर भेट देत आहेत…
▪ सर्व्हरवर जास्त ओझे पडल्यामुळे ओटीपी येण्यास कदाचित अडचण येते असेल…
▪ यावर उपाय: रात्री 11:00 नंतर किंवा सकाळी 4:00 ते 6:00 या वेळेत प्रयत्न करून पहा…
▪ सोपा उचय म्हणजे जवळच्या सेवा केंद्रात संपर्क करा.
💰 जून, जुलै, ऑगस्ट महिन्याचे हप्ते मिळत नसल्याची समस्या:
▪ KYC प्रमाणीकरण पूर्ण केल्यानंतर सर्व थकबाकी हप्ते एकाच वेळी मिळतील…
▪ महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिलीय…
▪ हप्ते मिळण्यास साधारणपणे KYC नंतर 15-30 दिवस लागू शकतात…
🚫 “आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत नाही” अशी त्रुटी:
▪मुख्य कारणे:
▪ कुटुंबात कोणाचे ITR रिटर्न भरलेले असणे…
▪ घरात एकापेक्षा जास्त महिला या योजनेचा लाभ घेत असतील…
▪ कुटुंबाकडे चार चाकी वाहन असेल…
▪ कोणीतरी सरकारी नोकरीत असेल…
▪ उपाय: तुमच्या घरच्या अर्जातील माहिती तपासा आणि अचूक माहिती भरा…
⏰ KYC ची अंतिम मुदत:
▪ KYC साठी 2 महिन्यांची मुदत असेल …
▪ सध्या चालू महिना + पुढचा महिना
▪ मुदत संपल्यानंतर KYC केल्यास योजनेतून बाहेर काढले जाऊ शकता…
❌ योजना बंद करण्याची प्रक्रिया:
▪ योजना बंद करण्यासाठी KYC करू नका…
▪ KYC न केल्यास योजना स्वतः बंद होईल
▪ पर्यायी म्हणून जवळच्या सेवा केंद्रात अर्ज करून योजना बंद करता येते…
🔔 महत्वाची सूचना:
▪कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका
▪फक्त अधिकृत स्रोतांकडून माहिती घ्या
▪कोणत्याही समस्येसाठी जवळच्या सेवा केंद्रात संपर्क करा
सर्व माहिती महिला व बाल विकास विभागाच्या अधिकृत https://ladakibahin.maharashtra.gov.in/ स्रोतांवर आधारित. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट भेट द्या.
