शहरातील गुरुकुल इंग्लिश स्कूल येथे पावसाळी क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन संपन्न मुलींच्या कबड्डी स्पर्धेने सुरुवात.
हिमायतनगर दि.५: शहरात माननीय आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालक महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा अधिकारी व तालुका क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने दि पाच ऑगस्ट रोजी हिमायतनगर शहरातील गुरुकुल इंग्लिश स्कूल येथे तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन हिमायतनगर शहराचे गटशिक्षणाधिकारी केशव मेकाले यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाले यावेळी मेकाले यांनी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करताना असे सांगितले की सध्या देशात ऑलम्पिक स्पर्धा सुरू आहेत पण ऑलम्पिक स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळवण्यामध्ये देशाचा पन्नास व क्रमांक आहे हा क्रमांक येणाऱ्या काळात देशाच्या लोकसंख्येप्रमाणे जरी नाही झाला तरी 25 वा क्रमांक मिळवण्यासाठी आपल्या सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे क्रीडा प्रशिक्षण देऊन क्रीडापटू निर्माण करा असे अनमोल मार्गदर्शन केले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की जिल्हा क्रीडा अधिकारी व तालुका क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने हिमायतनगर शहरात दि पाच ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन हिमायतनगर शहरातील गुरुकुल इंग्लिश स्कूल येथे आयोजित करण्यात आले होते या स्पर्धेच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांनी सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात केली या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून हिमायतनगर तहसीलचे नायब तहसीलदार ताडेवाड साहेब हे होते तर या कार्यक्रमाचे मुख्य उद्घाटक म्हणून गटशिक्षणाधिकारी केशव मेकाले तर प्रमुख पाहुणे म्हणून हिमायतनगर पंचायत समितीचे कक्ष अधिकारी गायकवाड,अरुण पाटील, गुरुकुल इंग्लिश स्कूलचे संस्थाचालक डॉ.मनोहर राठोड, क्रीडा शिक्षक अडबलवार सर, संजय पवार, गवंडी सर, दिक्कतवार सर, रेड्डी मॅडम,पत्रकार नागेश शिंदे सह आदी जर उपस्थित होते यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी केशव मेकाले यांनी असे सांगितले की या पावसाळी क्रीडा स्पर्धेची सुरुवात आज दिनांक पाच ऑगस्ट रोजी झाली या स्पर्धेमध्ये असंख्य विविध खेळ आहेत त्यामध्ये योग, बुद्धिबळ, बॅडमिंटन, फुटबॉल, कुस्ती, खो-खो ,कबड्डी ,हॉलीबॉल सह क्रिकेट सारख्या मैदानी खेळामध्ये तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपल्या ग्रामीण भागाचा ठसा जिल्ह्यामध्ये नावलौकिक करण्यासाठी करावा व देशात सुरू असलेल्या ऑलिंपिक स्पर्धेप्रमाणे हिमायतनगर तालुक्याचे नाव सुद्धा जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात नावलौकिक करावे असे उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या या क्रीडा स्पर्धेचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक शिंदे सर यांनी केले तर शेवटी आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्ष नायब तहसीलदार ताडेवाड यांनी मांनले
यावेळी गटशिक्षणाधिकारी केशव मेकाले,पंचायत समितीचे कक्ष अधिकारी गायकवाड, अरुण पाटील, क्रीडा संयोजक के.बी. शन्नेवाड, गुरुकुल इंग्लिश स्कूलचे संचालक डॉ. मनोहर राठोड, मुख्याध्यापक दिक्कतवार सर, गवंडी सर, कापसे सर, रेड्डी मॅडम, क्रीडा शिक्षक संजय पवार, अडबलवार सर ,नागेश शिंदे, सह आदी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड
