India Attack On Pakistan | पाकिस्तानच्या कुरापतींना भारताने आता जोरदार प्रत्युत्तर दिलं असून लाहोरनंतर आता थेट राजधानी इस्लामाबादवर हल्ला केला आहे. भारताच्या क्षेपणास्त्रांनी आता इस्लामाबादवर हल्ला केल्याची माहिती आहे. भारताच्या हल्ल्यानंतर इस्लामाबादमध्ये सायरनचे आवाज येत असून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
पाकिस्तानने भारताच्या नागरी वस्तीवर हल्ला केल्यानंतर तो हल्ला भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने निकामी केला. त्यानंतर आता भारताने पाकिस्तानला जशास तसं उत्तर देत आधी लाहोरवर हल्ला केला. त्यानंतर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादला लक्ष्य करत हल्ला केला.
पाकिस्तानमध्ये ब्लॅकआऊट
भारताच्या प्रतिहल्ल्यानंतर पाकिस्तानच्या अनेक भागात ब्लॅकआऊट करण्यात आलं आहे. पाकव्याप्त काश्मीर पूर्ण अंधारात गेलं आहे. तसेच इस्लामाबाद, कराची आणि लाहोरमध्येही ब्लॅकआऊट करण्यात आले आहे.