नांदेडात वंध्यत्व निवारण मार्गदर्शन परिषेदेच आयोजन
नांदेड दि.१० ऑक्टोबर : नांदेड स्त्रिरोग संघटना आणि महाराष्ट्र चॅप्टर ऑफ आयएसएआर (MSR) यांच्या संयुक्त विद्यमाने “ह्युमन रिप्रोडक्शन अँड फर्टिलिटी” म्जणजेच वंध्यत्व निवारण या झोनल परिषदेचे आयोजन ११ आणि १२ ऑक्टोबर २०२५ रोजी नांदेड येथील व्हीटीस् हॉटेल, भारत ई-स्क्वेअर मल्टिप्लेक्स येथे करण्यात आले आहे. या परिषदेचा उद्देश हा प्रसूती आणि स्त्रीरोग विषयातील नव्या तंत्रज्ञानांचा प्रसार करून वंध्यत्व उपचार आणि असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी (ART) मधील नव्या संशोधन व तंत्रज्ञानाची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांपर्यंत पोहोचवणे हा आहे अशी माहीती आयोजकांच्या वतीने आयोजित पत्रकार परिषेदेत देण्यात आली
अधिक माहीती देतांना त्यांनी सांगितले की , जागतिक किर्तीचे सुप्रसिद्ध वंध्यत्व तज्ज्ञ डॉ. जतिन शाह यांच्यासह .डॉ.सोनल पांचाळ, डॉ. सचिन कुलकर्णी, डॉ. चैतन्य शेंबेकर,डॉ.जय मेहता,डॉ.दिपाली शुक्ला, डॉ.रंजित जोशी,डॉ.निशा भटनागर,डॉ.अमोल लुकंड्ड,डॉ.मनिष माचवे, डॉ.धनंजय साठे,डॉ.तेजस गुंडेवार ,डॉ.कल्याणी पारडकर, डॉ. मन्जू जिल्ला यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे
या परिषेदेचे उदघाटन भोकर विधानसभेच्या आ.श्रीजया अशोकराव चव्हाण आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांच्या उपस्थितीत होणार आहे या परिषदेत देशभरातील ख्यातनाम तज्ज्ञ डॉक्टरांचे व्याख्यान व चर्चासत्रे होणार असून यात मराठवाड्यातील ५०० पेक्षा अधिक स््त्रीरोग तज्ञ डॉक्टरांचा सहभाग असणार आहे.
नांदेड स्त्रिरोग संघटनेच्या अध्यक्षा डॉ. मेघश्री देशमुख कहाळेकर यांच्या नेतृत्वात व सचिव डॉ. प्रांजली जोशी तसेच उपाध्यक्षा डॉ. मीनल पाटील, खजिनदार डॉ. शुभांगी पवार, सांयटिफिक कमिटीच्या अध्यक्षा डॉ. सरिका झुंझारे, डॉ. फसीहा तसनीम अजीज,डॉ.श्रीधर आलूरकर,डॉ.अनिल साखरे, डॉ. गायत्री वाडेकर, डॉ.राजेश नरवाडकर,डॉ.प्रियंका भालेराव, डॉ.रमा कदम, डॉ.स्नेहा ढगे, डॉ.निशाद जोशी,डॉ.मनिषा मुंडे,डॉ.अमरप्रितकौर रामगडीया, डॉ.सुचित्रा महींद्रकर,डॉ.अंजली मद्रेवार, डॉ. प्रिया बुरांडे, डॉ.कल्पना जमदाडे, डॉ.शिल्पा बोमनाळे, डॉ. सुप्रिया जोशी पाटोकर, डॉ. रमेश बोले, डॉ. संजय जवळगेकर , डॉ.सबा पटेल, डॉ.सई देगलूरकर यांसह नांदेड स्त्रिरोग संघटनेच्या सर्व सदस्य हे या परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत.
या दोन दिवसीय परिषदेतील विविध सत्रांमधून सहभागी डॉक्टरांना वंध्यत्व, आयव्हीएफ, एम्ब्रियो ट्रान्स्फर, एंडोमेट्रिओसिस आणि कलर डॉप्लर यासारख्या विषयांवर सखोल मार्गदर्शन मिळणार आहे. देशातील नामवंत तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमुळे ही परिषद वैद्यकीय क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. नांदेड शहरात अशा उच्च दर्जाच्या वैज्ञानिक परिषदांचे आयोजन होत असल्याने वैद्यकीय क्षेत्रात नांदेडचे नाव अधिक उज्ज्वल होईल, असा विश्वास यावेळी स्त्रिरोग संघटनेच्या अध्यक्षा डॉ.सौ.मेघश्री देशमुख कहाळेकर यांनी व्यक्त केला .