दिव्यांग सचिव तुकाराम मुंढे यांच्या पत्रांची दखल, चौकशी मात्र स्थानिक समितीकडेच : राहुल साळवे
नांदेड दि.२६ संष्टेबर: खोटे दिव्यांग प्रमाणपत्र जोडून शासनाची फसवणूक करून अनेकांनी शासकीय नौकऱ्या बळकावल्या आहेत. त्यामध्ये शिक्षक अधिकारी कर्मचारी हे दिव्यांग प्रमाणपत्राचा पुरेपूर लाभ घेत आहेत. परंतु एका लाखात बोगस प्रमाणपत्र घेऊन शासनाची फसवणूक करणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांची तपासणी मात्र ज्या अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र दिले आहेत त्या अधिका-यांच्या समितीत असलेले स्थानिक अधिकारीच तपासणी करून थातूरमातूर चौकशी करून सचिवांच्या पत्राची दखल घेऊन योग्यरीत्या चौकशी करत नसल्याचा आरोप सकल दिव्यांग संघटना महाराष्ट्राचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी एका तक्रारीद्वारे सचिवाकडे केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, राज्यामध्ये व जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढून शासनाची फसवणूक करून दिव्यांगांचे हक्क बळकावले जात आहेत. नुकतेच सचिव या पदावर तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाली व त्यांनी पदभार स्वीकारताच सर्वच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना दिव्यांग प्रमाणपत्रांचे चौकशी करण्याचे आदेश काढून पत्र दिले आहेत.
या आदेशावरून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिव्यांग शिक्षक कर्मचारी अधिकारी यांचे प्रमाणपत्र जिल्हा समितीच्या वतीने तपासणी करण्यास सुरुवात केली आहे परंतु ज्या अधिकाऱ्यांनी हे प्रमाणपत्र दिले आहेत त्यांच्याच समितीत असलेले अधिकारी या बोगस दिव्यांक प्रमाणपत्राची चौकशी करताना दिसत आहेत. त्यामुळे डोंगर पोखरून उंदीर काढल्यासारखे चित्र निर्माण होत आहे. याच बोगस दिव्यांगांची वरिष्ठ स्तरावर विभागीय अधिकाऱ्याकडून चौकशी केल्यास बोगस दिव्यांग प्रमाणपत्र उघडकिस येणार आहेत मात्र ज्या अधिकाऱ्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दिले आहेत त्यांच्याच समितीतील अधिकारी हे दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी करताना दिसत आहेत. त्यामुळे खऱ्या दिवांगांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होताना दिसत आहे. राज्य शासनाने व सचिवाने याची त्वरित दखल घेऊन विभागीय समितीवरून दिव्यांग शिक्षक अधिकारी कर्मचारी यांची चौकशी केल्यास सत्यता बाहेर येणार आहे त्यामुळे जिल्हा समितीवर हे चौकशीचे आदेश न देता विभागीय समितीवर चौकशीचे आदेश देऊन बोगस दिव्यांग प्रमाणपत्र धारकावर कडक कारवाई करावी अशी मागणी दिव्यांग संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे, प्रसिद्धी प्रमुख तथा ज्येष्ठ पत्रकार गंगाधर गच्चे यांनी एका निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री व दिव्यांग विभाग सचिव यांना निवेदन देऊन केली आहे. अन्यथा महाराष्ट्रामध्ये सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी या निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला आहे.













