Ladki Bahin Yojna | राज्यातील लाडक्या बहिणींना सध्या आपल्या सन्मान निधीची वाट पाहावी लागतीये. मे उजाडलाय पण एप्रिलचा(April) हप्ता अजुनही खात्यात जमा झाला नाहिये. त्यामुळे महायुती सरकारच्या लाडक्या बहिणी,(Ladki Bahin Yojna) आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याकडे डोळे लावून बसल्यात.
महायुती सरकारची (Mahayuti Sarkar) महत्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही काही ना काही कारणांमुळे सतत चर्चेत असते. त्या अंतर्गत 1500 रुपयांचा निधी वेळेवर महिलांच्या खात्यवर येत नाहीये. आता मे महिना उजाडला तरी एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना काही मिळाला नाही. अक्षय्य तृतीयेला निधी मिळेल असं खात्याच्या मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी सांगितलं होतं. पण आता मे महिना सुरू झाला तरी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत.
त्यामुळे राज्यातील कोट्यवधी लाडक्या बहिणींचं लक्ष आपल्या सन्मान निधीकडे लागलेत. यावरून आता विरोधकांनी टीका केलीये. महिलांना वेळेवर पैसे मिळत नसताना महिला, बाल विकास विभागाने कामगिरीत प्रथम क्रमांक कसा पटकावला असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. तर सावत्र भावांनी लाडक्या बहिणींची चिंता करू नये असा पलटवार मंत्री संजय शिरसाट यांनी केलीय. दरम्यान अखेर सरकारने लाडक्या बहिणींच्या निधीची व्यवस्था केली असून 2 ते 3 दिवसांत लाभार्थ्यांना निधी मिळेल अशी माहीती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलंय.
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे. पुढील 2 ते 3 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांना महिनाअखेरीस 25 तारखेपर्यंत पैसे मिळतात. एप्रिल महिन्यात मात्र पैसे खात्यात जमा झालेले नाहीत. दरम्यान एप्रिल महिना हा आर्थिक वर्षाच्या सुरुवातीचा महिना असल्याने हप्ता जमा होण्यास विलंब झाल्याची माहिती आहे. आता 2 ते 3 दिवसांत महिलांना निधी मिळणारेय. महायुती सरकारच्या 100 दिवसांच्या रिपोर्ट कार्डमध्ये महिला आणि बालविकास विभागाने बाजी मारली.त्यामुळे किमान आतातरी मंत्री आदिती तटकरेंनी याची जाणीव ठेवावी आणि लाडक्या बहिणींनी निधीसाठी प्रतीक्षा करायला लावू नये हि अपेक्षा.