जालना | मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टला मुंबईमध्ये आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. आंतरवाली सराटी येथील पत्रकार परिषदेत त्यांनी मराठा समाजाला मुंबईत येण्याचे आवाहन केले. फडणवीस यांना दोन दिवसांचे अल्टिमेटम देत, आरक्षण न मिळाल्यास सरकार उलथवून टाकण्याचा इशारा दिला. मराठा आणि कुणबी एक हजार (आधार) पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे.
५८ लाख नोंदीचा आधार असतानाही आरक्षण मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. इतर ओबीसी जातींना आधार नसतानाही आरक्षण मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. हैदराबाद गॅझेटियर अंमलबजावणीसह लागू करण्याची मागणी त्यांनी केली. गॅझेटियरवर १३ महिन्यांपासून अभ्यास सुरू असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. खोटी माहिती किंवा कारणे ऐकून घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “मी माझ्या समाजाच्या लेकराचं रडणं बघितलंय.
वेदना बघितल्यात. माझ्या जातीचे हाल मी बघितले. मी सोडीत नसतो ना,” असे जरांगे पाटील म्हणाले. सरकारकडून प्रतिसाद मिळत नसल्याने मराठा समाज पेटून उठल्याचे त्यांनी सांगितले.