राज्यपालांकडे ईमेलव्दारे केली तक्रार त्यांच्या विरुद्ध विद्यापीठ कायदा प्रमाणे कारवाई करण्याची मागणी
नांदेड दि.२९ ऑगस्ट : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे अधिसभा सदस्य तथा माजी व्यवस्थापन परिषद सदस्य तथा खरेदी समिती सदस्य डॉ.महेश मगर यांनी विद्यापीठात होत असलेल्या नियमबाहय खरेदी प्रक्रिया व देण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या कंत्राटाची पुरावासह तक्रार कूलगुरु यांच्याकडे केली होती. तत्कालीन प्रभारी वित्त व लेखा अधिकारी श्री मो. शकील अ.करीम यांच्या कार्यकाळात नियमबाह्य पद्धतीने कामे व कंत्राटे देण्यात आली होती. तसेच कंत्राटदारांना फायदा होईल अशी कारवाई त्यांच्याकडुन करण्यात आलेली आहे. विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षक पुरवठाच्या निविदेत सर्व करासहित सुरक्षा रक्षक पुरवठ्याचे दर मागविण्यात आले होते. परंतु त्यांनी नियमबाह्य पद्धतीने जीएसटी ची अतिरिक्त रक्कम कंत्राटदारास देण्यासाठी प्रयत्न केले व आजघडीला देण्यात येत आहेत अशी मागणी राज्यपालांकडे डॉ.महेश मगर यांनी राज्यपालाकडे ईमेलव्दारे केली आहे
तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की स्वच्छता सेवा हाउसकीपिंग व क्लीनिंग सर्विसेस या कामासाठी ई निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यांचेही दर सर्व करासहित मागविण्यात आले होते. त्या कंत्राटदाराने जीएसटीच्या अतिरिक्त रक्कमेची मागणी केली होती, परंतु मी या प्रकरणात तक्रार केली व त्यांना यापूर्वी प्रमाणे कारवाई करता आली नाही.
मागील कार्यकाळात परीक्षा विभागाचा उत्तर पत्रिका छापाई करण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती.परंतु कंत्राटदाराने निविदेतील अटी व शर्ती प्रमाणे उत्तर पत्रिकांचा पुरवठा केला नाही. यानंतरही चौकशी अंती त्यांनी कंत्राटदारासोबत असलेल्या आर्थिक तडजोडी मुळे कंत्राटदारास फायदा होईल अशी कारवाई करण्यात आलेली आहे.उत्तर पत्रिका योग्य आहेत व कंत्राटदारास तोंडी आदेशाने अग्रीम व नंतर देयकाची रक्कम अदा केलेली आहे.
तसेच मो.शकील अ.करीम यांची शैक्षणिक पात्रता नसताना त्यांना प्रभारी वित्त व लेखा अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली. तसेच त्यांना उप वित्त व लेखा अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली,जी की सहसंचालक उच्च व तंत्र शिक्षण विभाग नांदेड यांनी रद्द केली. तरी सुद्धा त्यांना प्रभारी उप वित्त व लेखा अधिकारी पदावर पून्हा बसविण्यात आले, कारण त्यांनी केलेल्या भ्रष्टाचार व अनियमितता दाबुन ठेऊन 30 ऑगस्ट 2025 रोजी त्यांना सोईस्कर व सुलभतेने सेवानिवृत्त होता येईल.अशी भिती त्यांनी व्यक्त केली आहे
चौकट
तक्रारीची त्वरीत चौकशी करावी – डॉ महेश मगर या तक्रारची तातडीने चौकशी करून नियमाप्रमाणे मो.शकील अ.करीम यांच्या विरुद्ध कार्यवाही करण्यात यावी. त्तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांच्या सेवानिवृत्तीचे वेतन थांबविण्यात यावे ही नम्र विनंती राज्यपालांकडे करण्यात आली आहे
डॉ महेश आनंदराव मगर, अधिसभा सदस्य, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड.