नांदेड दि.१३: आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे व अतिरीक्त आयुक्त गिरीष कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त (महसुल) डॉ.पंजाब खानसोळे यांच्या नियंत्रनाखाली आज दि, १३ जानेवारी रोजी क्षेत्रिय कार्यालय क्र.५ ईतवारा हैदरबाग पाण्याची टाकी येथे मालमत्ता कर व पाणी कर वसुलीचा कॅप आयोजीत करण्यात आला आहे. तसेच नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व मालमत्ताधारकांना आवाहन करण्यात येते की, मालमत्ता कर सुट व थकबाकी शास्ती सुट योजनेचा नागरिकांना लाभ घेता यावा याकरिता सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी दि. १४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता हनुमान मंदिर महावीर चौक येथे मालमत्ता कर व पाणी कर वसुलीचा कॅम्प आयोजीत केला आहे. तरी या परिसरातील नागरीकांना आहवान करुन मालमत्ता कर थकबाकी वरील ४० टक्के शास्ती माफीचा फायदा देण्यात येत आहे.
तसेच क्षेत्रीय कार्यालयातील कर भरणा वजिराबाद चौक येथे सकाळी ९.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत चालु राहणार आहे. करिता नागरिकांनी मालमत्ता कर व पाणी कराच्या थकबाकी शास्तीमध्ये ४० टक्के सुट योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड