नांदेड दि.१९: नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड अंतर्गत विशेष कर वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच ३१ जानेवारी २०२४ पर्यंत ४० टक्के शास्ती माफी योजना लागु असुन. त्यानुसार जास्तीत जास्त मालमत्ता धारकांकडुन कर संकलन करुन वसुलीचे उद्दीष्टे १०० टक्के पुर्ण करण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी दिलेले आहेत. त्यानुसार उपायुक्त (महसुल) डॉ.पंजाब खानसोळे यांनी सर्व क्षेत्रिय कार्यालयांना थकबाकीदार यांच्याकडुन कर वसुली करावी व कर भरण्यास नकार दिल्यास जप्तीची कार्यवाही करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत.
आज दिनांक १९ जानेवारी २०२४ रोजी क्षेत्रिय कार्यालय क्र.१ तरोडा-सांगवी अंतर्गत मालमत्ता धारक पिन क्र.४०६०२०२४९१ नाव श्री राजेश्वर गुड्डु या मालमत्ता धारकांकडुन करापोटी रु.९७,७४९/-एवढी मालमत्ता कराची रक्कम येणे शिल्लक होती. सदरील कराची रक्कम भरण्यासाठी असमर्थता दर्शविल्यामुळे संबंधित मालमत्ता धारकाची नळ जोडणी खंडीत करण्यात आली आहे. सदर कार्यवाही क्षेत्रिय अधिकारी सौ. निलावती डावरे, वसुली पर्यवेक्षक साहेबराव ढगे, नागेश एकाळे, विठ्ठल तिडके, वसुली लिपीक अनिल चाँदंते, वडजकर यांनी पार पाडली.
महानगरपालिका हद्दीतील मालमत्ता धारकांनी आपल्या मालमत्तेचा चालु व थकीत कराचा भरणा करुन महानगरपालिकेस सहकार्य करावे व जप्तीसारखी अप्रिय घटना टाळावी, असे आवाहन उपायुक्त (महसुल) डॉ.पंजाब खानसोळे यांनी केले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड













