नांदेड दि.३० संष्टेबर: जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील जनसंपर्क विभागात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक (ग्रेड) सूर्यभान कागणेसह तिघेजण नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. या तिघांनाही पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अश्विनी जगताप यांनी निरोप दिला. यावेळी सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. हा कार्यक्रम मंथन सभागृहात मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी घेण्यात आला.
यापुढील आयुष्य सेवानिवृतांनी आपल्यासाठी व आपल्या कुटूंबासाठी अधिक वेळ देऊन आरोग्यांची काळजी घेत सुखी आणि आनंदी राहण्याचा सल्ला अबिनाश कुमार यांनी दिला. यावेळी पोलीस कल्याण विभागाचे निरीक्षक जगदीश मंडलवार, जनसंपर्क विभागाचे पोलीस उपनिरीक्षक जळबाजी गायकवाड, पत्रकार विजय जोशी, प्रल्हाद कांबळे, राजू झंवर यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदार मोठया संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रूक्मीण कानगुले यांनी केले. तर जनसंपर्क विभागातील अंमलदार मारोती कांबळे, रविंद्र राठोड, विनोद भंडारे, पोलीस कल्याण विभागातील अंमलदार सविता भिमलवाड यांनी परिश्रम घेतले. सेवानिवृत्त झालेल्या मध्ये पोलीस उपनिरीक्षक सूर्यभान कागणे, केशव चाटे आणि चालक हवालदार दत्ता गीते यांचा समावेश होता. दरमहा तपासणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात आलेले पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनीही सूर्यभान कागणे यांना शुभेच्छा दिल्या.