नांदेड दि.५ जुलै:
दिव्यांगांच्या प्रलंबित विविध मागण्यां संदर्भात नांदेड येथील सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने शेकडो दिव्यांग मुंबई येथील पावसाळी अधिवेशनात गनीमीकाव्याने घुसुन मंत्रीमंडळाचे लक्ष केंद्रित करणार आहेत, नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील
मंत्रीमंडळ, आमदार यांना जागे
करण्यासाठी शेकडो दिव्यांग दिव्यांग नेते राहुल साळवे, चंपतराव डाकोरे यांच्या नेतृत्वाखाली कुठलीच पुर्वसुचना न देता गनीमी कावा करत पावसाळी अधिवेशनात घुसणार आहेत.
कारण, निवडणुकीत दिव्यांग,वृध्द,निराधारांचे कैवारी म्हणुन मतदान केंद्र दिव्यांगांच्या घरी नेऊन मते घेऊन सत्तेत गेल्यानंतर अधिवेशनात दिव्यांगांचे एकही प्रश्न आमदार लक्षवेधीत मांडत नाहित, दिव्यांगांसाठी असलेला आमदार निधी खर्च करीत नाहित, दिव्यांग दिड हजार रूपयात कसे जीवन जगत असतील याचा सुद्धा विचार करत नाहित त्यामुळेचे खालील मागण्यांच्या अनुषंगाने अधिवेशनात घुसनार असल्याचे म्हटले आहे. यामध्ये
दिव्यांग व्यक्ती साठीचे अधिनियम आरपीडब्ल्यु डी ॲक्ट २०१६ ची अंमलबजावणी करणे, महाराष्ट्र राज्य दिव्यांग धोरण २०१८ ची अंमलबजावणी करणे यासह शासनाच्या आजवर निर्गमित करण्यात आलेल्या सर्व शासन निर्णयांची अंमलबजावणी करणे, आमदार निधी, खासदार निधी दरवर्षी खर्च करणे,सजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांगांचे मानधन तेलंगनाच्या धर्तीवर ५ हजार रूपये करणे, जिल्हा नियोजन समितीच्या विकास निधीत दिव्यांगांसाठी ५ टक्के राखीव निधीची तरतूद करणे व दरवर्षी खर्च करणे, दिव्यांगांचा शासकीय अनुशेष तत्काळ भरून काढणे. दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर बेरोजगार दिव्यांगांना तीनचाकी स्कुटीसह इतर उपकरणे उपलब्ध करून देणे, शासनमान्य दिव्यांग शाळेमध्ये ५० टक्के दिव्यांग कर्मचारी यांची भरती करणे, बोगस दिव्यांग शिक्षक व कर्मचारी यांच्यावर फसवणूकीचे गुन्हे दाखल करणे, बेरोजगार दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी निःशुल्क २०० स्क्वेअर फूट जागा व शासकीय गाळे उपलब्ध करून देणे, शिवाई इलेक्ट्रिक बसेस मध्ये दिव्यांगांना वनफोर्थ तिकीटची सुविधा उपलब्ध करणे, स्थानिक स्वराज्य संस्था व नागरी स्वराज्य संस्थाकडील दिव्यांगांचा राखीव निधी दरवर्षी खर्च करणे या व इतर मागण्यांच्या अनुषंगाने सकल दिव्यांग संघटना नांदेड,लातुर,हिंगोली,जालना यासह अनेक जिल्ह्यातील सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात गनिमी कावा करत अधिवेशनात घुसणार आहेत अशी माहिती दिव्यांग नेते राहुल साळवे आणि चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!