७१ वर्षांनी येणाऱ्या श्रावण मासाचे अवचित्य साधून आज स्मशानात सुद्धा महादेवाची भक्तांकडून पूजा अर्चना संपन्न
हिमायतनगर दि.५: शहरातील श्री जाज्वल्य देवस्थान असलेल्या वाढोणा वासीयांचे श्रध्दास्थान हरिहर आणि शंकररूपी अवतारातील श्री परमेश्वर महाराज यांच्या मूर्तीचा जल व दुग्ध अभिषेक सोहळा संपन्न झाल्या नंतर शहरातील वैकुंठधाम स्मशानभूमी येथील ब्रम्हांडनायक श्री भोळ्या शंकर महादेवाची पूजा अर्चना करून अनेकांनी दर्शन घेतले 71 वर्षानंतर आलेल्या श्रावणी मासाच्या सोमवारचा व्रत करनाऱ्या साठी शहरासह तालुक्यातील हजारो भक्तांनी श्री परमेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी मोठी गर्दी केली असल्याचे मंदिर संस्थानचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी सांगितले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की यावर्षीचा श्रावण मास महिना हा 71 वर्षांनी आल्यामुळे हिमायतनगर शहरासह संपूर्ण महाराष्ट्रातील भक्तांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे या महाशिवरात्री निमित्त शंभू शंकर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी शहरातील श्री परमेश्वर देवस्थान येथे तालुक्यासह पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी अलोट गर्दी केली असल्याचे पाहायला मिळाले व पिंपळगाव संस्थांचे महाराज श्री बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी सांगितल्या प्रमाणे अखंड ओम नमः शिवाय जपाचा शुभारंभ सुद्धा आज पवित्र श्रावणी सोमवारच्या पावन-पर्वावर श्री परमेश्वर मंदिर देवस्थान येथे करण्यात आला आहे 71 वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर आलेल्या पवित्र श्रावण मासाची सुरवात दि.०५ ऑगस्ट रोज सोमवार पासुन झाली असून श्रावणाच्या पहील्या सोमवारी श्री परमेश्वर देवस्थान येथील महादेवाचे दर्शन घेण्यासाठी तालुक्यातील हजारो भाविक भक्तांनी मंदिर परिसरात दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. मंदिरातील श्रीला बेल पत्र, हळद कुंकू, फुलाने पुजा-अर्चना करून शिवपती महादेव मंदिरातील शिवलिंगाला हजारो महिलांनी आज बेलपत्र आणि दुधाने अभिषेक करून पुण्य प्राप्त केले विदर्भ -मराठवाडयाच्या सिमेवर असलेल्या हिमायतनगर (वाढोणा) शहरवासीयांचे श्रध्दास्थान श्री परमेश्वराचे मंदीर आहे. मंदीरातील भुयारात ७२० वर्षापुवीची श्री परमेश्वराची उभी मुर्ती असुन, विष्णुच्या दहा अवतारा पैकी हा एक अवतार असल्यामुळे या मूर्तीच्या दर्शनासाठी दूर दूर वरून अनेक भाविक भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले त्याचबरोबर हिमायतनगर शहरातील लकडोबा चौक येथील हिंदू वैकुंठ धाम स्मशान भूमी मध्ये सुद्धा उभारण्यात आलेल्या शंभू महादेवाची पूजा अर्चना श्रावण मासाच्या पावन पर्वावर करण्यात आली
यावेळी श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ , सचिव अनंता देवकते, सदस्य विलास वानखेडे, संजय माने सह वैकुंठ धाम स्मशान भूमीचे सचिव सुभाष बल्पेलवार, डॉ. राजेंद्र वानखेडे, परमेश्वर रेड्डी, सुभाष शिंदे, मारोती हेंद्रे, मायंबा होळकर, दत्ता सूर्यवंशी ,नागेश शिंदे सह आदी जन उपस्थित होते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड
