• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Tuesday, March 3, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home विशेष लेख

बाबासाहेबांचा विचारच दिशाहीन युवकांच्या आयुष्याला योग्य आकार देऊ शकतो. – मंगेश गाडगे

13 April 2025
in विशेष लेख, Top News
ambedkar-color-hd-photo-banner-wallpaper
36
SHARES
243
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे नाव उच्चारले कि थेट डोळ्यासमोर येतं भारतीय संविधान. भारतीय संविधानाचे ते शिल्पकार आहेत एवढं शिकवलं जातं शाळा महाविद्यालयातुन पण यापलीकडे जे त्यांचं मानव मुक्तीचं कार्य आहे. त्यांची सामाजिक, शैक्षणिक व राजकीय चळवळ आहे. विविध क्षेत्रात त्यांनी दिलेलं योगदान युवकांच्या समोर येतच नाही. किंबहुना ते येऊ दिलं जात नाही. त्यामुळे युवकांना शाळेच्या बाहेर बसुन शिकलेले, समाजासाठी जगलेले,पिण्याच्या पाण्यासाठी लढलेले व समतेसाठी व्यवस्थेशी भिडलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर हे युवकांना समजत नाहीत. त्यांचा शिक्षणविषयक संदेश आम्हाला फक्त “शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा” एवढा मंत्र सांगितल्यागत सांगितल्या जातो. पण शिका म्हणजे काय शिका? हे समजून सांगितले जात नाही.

या स्पर्धेच्या युगात काय शिकावं? आणि का शिकावं? याची उत्तरे आपल्याकडे स्पष्टपणे असायला हवी. जसे आपण परंपरागत व्यवसाय करत होतो तसे परंपरागत शिक्षण घेत गेलो तर आपण या स्पर्धेत टिकु शकणार नाही. जगाची मागणी ओळखुन किंवा किमान समाजातील बदल लक्षात घेऊन शिक्षण घेणे गरजेचे आहे. कोणी अर्धवट विद्वान म्हणेल बाबासाहेबांनी काही पोट भरण्यासाठी किंवा नोकरीसाठी शिकायला नव्हतं सांगितलं तर शिक्षणामुळे बुद्धीचा विकास होतो आणि विकसित बुद्धीची लोकं समाजाला दिशा देऊ शकतात. हे म्हणने अगदी योग्य आहे पण माझ्या मते जर एखाद्याचे शिक्षण त्याचा भाकरीचा प्रश्न सोडवू शकत नसेल, जे शिक्षण त्याच्या कुटुंबाचे जीवनमान उंचाऊ शकत नसेल ते शिक्षण कधी समाजाला दिशा देईन. समाजाला दिशा द्यायची जबाबदारी शिकलेल्या लोकांवर आहे म्हणून सर्वांनी समाजशास्त्र, राज्यशास्त्र व समाजकार्य या विषयावर संशोधन करणे गरजेचे आहे का? समाजातील प्रत्येक जण समाजाला दिशा द्यायची म्हणून असेच करत राहिला तर दिशा कोणाला देणार? कारण दिशा देण्यासाठी समाजात माणुसच राहणार नाही. सर्वजण समाजाचे दिशादर्शक. असे बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत नव्हते असे मला वाटते. विविध क्षेत्रात युवकांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला पाहिजे. समाजाला फक्त सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पुढारी यांचीच गरज नसते तर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण महत्त्वाचे असतात. हे आंबेडकरी परिप्रेक्षातून युवकांना समजून सांगणे काळाची गरज आहे.

नाहीतर आज आपण पाहतोय समाजाला दिशा देण्याच्या नादात स्वतःच्या आयुष्याची दिशा कधी भरकटली हे सुद्धा युवकांच्या लक्षात येत नाही. डॉक्टरेट व पोस्ट डॉक्टरेट झालेली तरूण मुलं दोन वेळच्या भाकरीची सोय होईल एवढ्या पगाराची नोकरी शोधत शहराशहरात भटकत आहेत. त्यांच्या आयुष्याचं कोणतं गणित चुकलं हेच लक्षात येत नाही. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अगदी मूलगामी व कालसुसंगत आहेत परंतु आपण आजच्या परिस्थितीची आंबेडकरी दृष्टीकोनातून चिकित्सा करायला गल्लत करतो आणि आपल्या आयुष्याचं गणित चुकतं.

मला वाटतं आपण विचारांनी प्रगल्भ झालो. बाबासाहेब आंबेडकरांसह इतर सर्वांनी कोणत्या ग्रंथात काय लिहिलेलं आहे हे पान नंबर सहित सांगु शकतो पण त्या विचारांना आजच्या परिस्थितीत कसे उतरवावे किंवा कसे अंगिकारावे हे आपणास समजत नाही.कृतीशिवाय विचारांना अर्थ नाही पण ती कृती ही आजच्या आधुनिक काळाशी सुसंगत असायला हवी. अन्यथा काळ त्या कृतीला स्विकारत नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातील प्रत्येक घटना आपल्यासाठी प्रेरणादायी आहे त्यामुळे आपल्याला युट्युब किंवा इन्टाग्रामवरून कोण्या बाजारु व्यक्तींकडून प्रेरणा उसनी घ्यायची गरज नाही. फक्त आपण बाबासाहेब आंबेडकर समजुन घेतले पाहिजे. त्यांचे विचार अंगिकारले पाहिजे आणि समाज सुधारण्याचा विचार करण्यापुर्वी आपण व आपले कुटुंब सुधारले पाहिजे. प्रत्येकाने आपण व आपले कुटुंब सुधारले तर समाज आपोआप सुधारेल. आपण हे सर्रास विसरतो कि आपणही समाजाचा भाग आहोत. आपण स्वतः सुधारण्याआधी समाज सुधारण्याचा विचार करतो त्यामुळे ना समाज सुधारतो ना आपलं कुटुंब सुधारतं. समाज सुधारण्यासाठी तरी कोणी दुसरा व्यक्ती येईल पण आपल्याला व आपल्या कुटुंबाला दोन वेळची भाकर द्यायला कोणी येणार नाही. हे गोरगरीब तरुणांनी व युवकांनी समजुन घ्यावे. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना केंद्रस्थानी ठेऊन आयुष्याची आखणी करावी. माझे स्पष्ट मत आहे त्यांच्या आयुष्याला योग्य आकार नक्की मिळेल.
शेवटी एवढेच वाटते कि,

आंधळ्याची काठी म्हणजे… बाबासाहेब,
अंधार्या वस्तीची ज्योती म्हणजे…बाबासाहेब,
आमच्या जगण्याचे तंत्र… बाबासाहेब,
शोषितांच्या प्रगतीचे होकायंत्र… बाबासाहेब…

Mangesh Gadge

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना व कार्याला सलाम.

– ॲड.मंगेश गाडगे
( कायदे अभ्यासक,नवी मुंबई)

Tags: Dr. Babasaheb AmbedkarDr. Babasaheb Ambedkar JayantiDr.Babasaheb AmbedkarMangesh GadgeSatyaprabha News
Previous Post

आंबेडकर जयंती निमित्ताने दादरमधील अनेक मार्गांवर प्रवेश बंद; चैत्यभूमीवर होणाऱ्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी वाहतुकीत बदल

Next Post

आज, सोमवार, १४ एप्रिल २०२५ रोजीचे राशिभविष्य

Next Post
Horoscope Today: कामाच्या ठिकाणी तणाव, कुटुंबात मात्र आनंदी वातावरण; 'असा' आहे कुंभ राशीचा आजचा दिवस

आज, सोमवार, १४ एप्रिल २०२५ रोजीचे राशिभविष्य

Stay Connected

  • 327k Fans
  • 1.7k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    The Instagram Access Token is expired, Go to the Customizer > JNews : Social, Like & View > Instagram Feed Setting, to refresh it.
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10274
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

7805
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6404
image editor output image372790316 1704806870229

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान
शाळांना मिळणार लाखोंची बक्षिसे

280
Hadsani News

प्रशासनाचा आदेश धाब्यावर! हडसणीत साखर कारखान्याकडून गायरान जमिनीवर डल्ला; तहसीलदारांच्या स्थगितीनंतरही भिंतीचे काम सुरूच

2 March 2026
Hadgaon News

हडसणीतील गायरान जमिनीवरील अतिक्रमणाविरोधात ‘परिवर्तन’चा एल्गार; तहसीलदारांकडे अधिकृत तक्रार दाखल

28 February 2026
image editor output image 663345551 1772088599085

महावितरण अधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळे जानेफळ येथील रोहित्र अग्नीच्या विळाख्यात.

26 February 2026
Rohit Pawar

Rohit Pawar: अजितदादांना न्याय मिळेल का? अशी शंका…:रोहित पवार

25 February 2026

Recent News

Hadsani News

प्रशासनाचा आदेश धाब्यावर! हडसणीत साखर कारखान्याकडून गायरान जमिनीवर डल्ला; तहसीलदारांच्या स्थगितीनंतरही भिंतीचे काम सुरूच

2 March 2026
Hadgaon News

हडसणीतील गायरान जमिनीवरील अतिक्रमणाविरोधात ‘परिवर्तन’चा एल्गार; तहसीलदारांकडे अधिकृत तक्रार दाखल

28 February 2026
image editor output image 663345551 1772088599085

महावितरण अधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळे जानेफळ येथील रोहित्र अग्नीच्या विळाख्यात.

26 February 2026
Rohit Pawar

Rohit Pawar: अजितदादांना न्याय मिळेल का? अशी शंका…:रोहित पवार

25 February 2026

Satyapabha News…

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Hadsani News

प्रशासनाचा आदेश धाब्यावर! हडसणीत साखर कारखान्याकडून गायरान जमिनीवर डल्ला; तहसीलदारांच्या स्थगितीनंतरही भिंतीचे काम सुरूच

2 March 2026
Hadgaon News

हडसणीतील गायरान जमिनीवरील अतिक्रमणाविरोधात ‘परिवर्तन’चा एल्गार; तहसीलदारांकडे अधिकृत तक्रार दाखल

28 February 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज