ता. प्र. दत्तात्रय सज्जन
धर्माबाद दि.३ जुलै : तालुक्यातील आलूर गावचे भूमिपुत्र सैनिक चरण बुद्धिवंत यांच्या १७ वर्षांच्या देशसेवेनंतर आगमन झालेल्या सन्मान यात्रेचे धर्माबाद येथील मुस्लिम समुदायाने शाल आणि फुलांचा हार घालून मनापासून स्वागत केले.
ऑपरेशन सिंदूर मोहीम यशस्वीरित्या राबवत व १७ वर्षे देश सेवा करून सेवानिवृत्त होत असणाऱ्या चरण बापन बुद्धिवंत यांच्या सत्कार सोहळ्यात माजी नगर सेवक समीर भाई,माजी उपाध्यक्ष यूनुस खान, शेख तोफिक(इज्जू भाई), नविद अहमद, पत्रकार म.मुबशिर, शेख सादिक करखेलीकर, अस्लम खान, डॉ.शेख मोईन सर, मिन्हाज बेग, इद्रिस पटेल , जुनैद खान, गौस खान, आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते आणि त्यांनी समाजाच्या वतीने सैनिक बुद्धिवंत यांनी देशासाठी केलेल्या १७ वर्षांच्या सेवेचे कौतुक केले.
तालुक्यातील सर्व जाती धर्मातील नागरिक उपस्थित होते.