हिमायतनगर तालुक्यातील डोल्हारी जवळील घटना
हिमायतनगर ता.प्र नागेश शिंदे दि.२:तालुक्यातील पळसपूर ते डोल्हारी दरम्यान पैनगंगा नदी पुराच्या वेढ्यात बाबळीच्या झाडावर जवळपास १५ वानरे अडकून पडली असून, १२ तास झाले तरी पुर ओसरला नसल्याने वानरांचा मुक्काम झाडावरच आहे. हि घटना दि. २ सोमवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या दरम्यान उघडकीस आली असून स्थानिक नागरिकांनी ही माहीती वन विभागाला दिली आहे.
हिमायतनगर तालुक्यात ३१ च्या मध्यरात्रीनंतर जोरदार अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीत अनेक नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. दरम्यान दि. १ रविवारी सायंकाळपर्यंत जवळपास १५ वानरे ही पळसपूर, डोल्हारी शिवारात पैनगंगेच्या नदीकाठावरील एका झाडावर थांबली. पैनगंगेच्या वरच्या भागात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली असल्याने अचानक पैनगंगेला पुर आला. आणी पैनगंगा नदी अजूबाजूचा परिसर कवेत घेऊन वाहू लागली. या पैनगंगेच्या पुराच्या पाण्यात एका झाडावर जवळपास १५ वानरे अडकून पडली आहेत. झाडाला पुराचा वेढा पडला असल्याने वानराना आजची रात्र आणी पुर ओसरे पर्यत झाडावरच थांबणे भाग पडत आहे. हि माहीती स्थानिक नागरीकांनी वन विभागाला दिली. दरम्यान वन विभागाकडून दि. ३ मंगळवारी उपाय योजना करण्यात येतील. असे. सांगण्यात परंतू १२ तास झाले ही वानरे तेथेच अडकून पडली आहेत.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड













