ता. प्र. दत्तात्रय सज्जन
धर्माबाद दि.१९ जून : जिद्द चिकाटी मेहनत या बळावर आपल्या छोट्याशा अतकूर या गावातून प्रवीणने बँकेची परीक्षा पास होऊन राष्ट्रीयकृत स्टेट बँक ऑफ इंडिया या नामांकित बँकेमध्ये नोकरी मिळवली. त्याचा हा आदर्श घरच्यांसाठी व त्याच्या समवयस्क मित्रासाठीही प्रेरणादायी आहे. आयुष्यात प्रवीणने आपल्या कर्तुत्वाने आपल्या गावचा व देशाचा गौरव वाढवावा असे प्रांजळ प्रतिपादन जिल्हा परिषद हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा त्या गावचे रहिवासी जी.बी. वाघमारे यांनी केले.
अतकुर गावचे सरपंच तंत्रशिला हिराकांत वाघमारे यांचे सुपुत्र प्रवीण वाघमारे यांचा एस.बी.आय. बँकेमध्ये क्लर्क म्हणून अवघड परीक्षा पास झाल्यावर नुकतीच निवड करण्यात आली.त्यानिमित्त त्याचा गावात सत्कार ठेवण्यात आला होता. याप्रसंगी वाघमारे सर अध्यक्षीय समारोपात बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य तथा गावचे रहिवासी गंगाधर तोटलोड, मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा धर्माबादचे जेष्ठ पत्रकार जी.पी. मिसाळे, भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुका अध्यक्ष सदानंद देवके, डॉक्टर नवीन कुमार गैनी, माजी सरपंच अनिल कोल्हेवाड तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य,व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे धर्माबाद तालुका अध्यक्ष संजय कदम, सामाजिक कार्यकर्ते राहुल भुतनरे यांच्यासह अनेक नागरिक व महिला उपस्थित होते.
धर्माबाद तालुक्यातील अतकुर या छोट्याशा गावाने नुकताच हा अभिमानास्पद क्षण अनुभवला, जेव्हा गावचा रहिवासी प्रवीण वाघमारे याने बँकिंग परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण करून स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) या राष्ट्रीयकृत बँकेत क्लर्क पदावर नियुक्ती मिळवली. या यशानिमित्त गावात प्रवीणचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!