नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांचा आदर्श उपक्रम एका महिन्याचा पगार पुरग्रस्तांसाठी आर्थिक मदत म्हणून
नांदेड दि.२८: नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी व ओल्या दुष्काळामुळे शेतकरी बांधवांवर संकट ओढावले आहे. शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा वेळी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पो नि. ओमकांत चिंचोलकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत आदर्शवत पाऊल उचलले आहे.
पो.नि.आओमकांत चिंचोलकर आपला सप्टेंबर महिन्याचा पूर्ण पगार (अंदाजे १ लाख रुपये) पुरग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निधी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन निधी, एनजीओ किंवा पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून गरजूंना पोहोचावा, अशी विनंती त्यांनी मा. पोलीस अधीक्षक यांना केली आहे.
स्वतः शेतकरी कुटुंबातून आलेले व यवतमाळ जिल्ह्यातील पुरग्रस्त गावचे रहिवासी असलेल्या चिंचोलकर यांना संकटाची वेदना प्रत्यक्ष अनुभवता आली आहे. “शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. माझा एक महिन्याचा पगार हा सामाजिक बांधिलकी म्हणून पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अर्पण करतो,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या उपक्रमामुळे पोलिस दलातील संवेदनशीलता अधोरेखित झाली असून समाजात सकारात्मक संदेश गेला आहे.