नांदेड दि.७: ७ जुलै रोजी जागतिक रेबीज दिनानिमित्ताने प्राणी रेबीज लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. १४० वर्षापूर्वी याच दिवशी विख्यात शास्त्रज्ञ लुईस पाश्चर (Louis Pasteur) यांनी मानवास प्रथम रेबीज लस टोचली होती. त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो.
या दिनानिमित्त रोटरी क्लब नांदेड व नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरात एकूण ३३ प्राण्यांना रेबीज लस टोचण्यात आली. यावेळी उपस्थित असलेल्या लोकांना pamphlet देण्यात आले, ज्यात कुत्रा चावण्यापासून कसे वाचावे, कुत्रा चावल्यावर काय करावे, प्राण्यांमध्ये रेबीजची कोणती लक्षणे असतात, पाळीव प्राण्यांचे रेबीज पासून कसे संरक्षण करावे इत्यादी माहिती देण्यात आली. तसेच प्राण्यांसाठी Feed व Calcium supplement चेही वाटप करण्यात आले.
या प्रसंगी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रईसउद्दीन व त्यांचा कर्मचारीवर्ग यांनी प्राण्यांचे लसीकरण केले. रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.CA मितेश मालीवाल आणि सचिव रो. डॉ. मालू बी. आर व प्रोजेक्ट डायरेक्टर रो. येवतीकर, रो. श्याम गंदेवार, रो. गरुडकर, रो. भारतीया, रो. अवस्थी, रो. गोपाल बंग यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला.
या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये प्राण्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढीस लागेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.