मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी
नांदेड दि.१२ ऑगस्ट: नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीमध्ये राज्य व केंद्र सरकारच्या वतीने बेघरांना पक्का निवारा मिळावा यासाठी पंतप्रधान आवास योजना व रमाई आवास योजनेमधून घर बांधकामासाठी आर्थिक मदत दिली जाते व या योजनेसाठी खाजगी कंपनी अधिकारी कर्मचाऱ्यांकडून योजना राबवण्यात येते परंतु गोरगरिबांना घरकुलाचा लाभ न देता श्रीमंत व शासकीय नोकरदारांचे नावे यादीमध्ये घेऊन त्यांनाच घरकुलाचा लाभ दिला असून यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे आणि यासाठी महापालिकेचे कर्मचारी अधिकारी सुद्धा जबाबदार आहेत. त्यामुळे सर्वे करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी व संबंधित महानगरपालिकेचे अधिकारी यांची त्वरित सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी सकल दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष यांनी मुख्यमंत्र्याकडे निवेदन देऊन केली आहे.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात घरकुल योजना राबवण्यात आली या घरकुलामुळे अनेकांना पक्का निवारा देण्यात आला परंतु या घरकुल योजनेमध्ये सर्वे करणारे कर्मचारी व संबंधित कार्यकारी अभियंता महानगरपालिका यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून गोरगरिबांची नावे घरकुल यादी मध्ये न टाकता पैसे दिले त्यांचीच नावे टाकलेले आहे त्याचबरोबर पन्नास हजार रुपये द्या घरकुल घ्या ही योजना त्यांनी राबविल्या असल्याच्या अनेकांच्या तक्रारी आल्या आहेत तर एकाच घरकुलावर तीन लाभार्थ्यांची नावे टाकून शासनाचा लाखो रुपयांचा निधी हडप केला असल्याचेही म्हटले आहे. दुसरीकडे मात्र गोरगरीब जनता महानगरपालिकेमध्ये घरकुलासाठी चकरा मारताना दिसत आहेत परंतु त्यांना अद्यापही घरकुल योजनेचा लाभ दिला जात नाही ज्या लाभार्थ्यांनी घरकुलासाठी पैसे दिले अशाच लोकांची कामे या महानगरपालिकेत होताना दिसत आहेत याबाबत संबंधित कंपनीचे कर्मचारी यांना तुटपुंजे मानधन असतानाही त्यांची कोट्यावधींची प्रॉपर्टी झाली आहे. दुसरीकडे यांच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या कार्यकारी अभियंतांनाही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून लाखो रुपयाची संपत्ती गोळा केली आहे. त्यामुळे यावर काम करणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांची त्वरित चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन केली आहे. या निवेदनावर सकल दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे. कमल फाउंडेशनचे अध्यक्ष अमरदिप गोधने.सकल दिव्यांग संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख गंगाधर गच्चे यांनी निवेदन देऊन केली आहे त्वरित यांची चौकशी करावी अन्यथा सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे