GMC Nanded Bharti 2025 | Nanded | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड येथे 86 पदांसाठी भरती, त्वरित करा अर्ज
भरती विभाग: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड(GMC Nanded Bharti 2025)
पदाचे नाव: गट-ड (वर्ग 4) सर्व संवर्ग, पद संख्या: 79
गट-ड (वर्ग 4) प्रयोगशाळा परिचय
पद संख्या: 17
एकूण जागा: 86 जागासाठी भरती होत आहे.
शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण
स्वच्छक पदासाठी 07 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयाची अट: 24 एप्रिल 2025 रोजी 18 ते 38 वर्ष असणे आवश्यक आहे.
मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्ष सूट आहे.
अर्ज प्रक्रिया: अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
फि: खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु,1000/-
मागासवर्गीय/आदुघ: उमेदवारांना रु.900/- चलन आहे,
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 मे 2025
महत्वाचे लिंक:
जाहिरात pdf | खाली दिलीय |
ऑनलाईन अर्ज | Apply करा |
अधिकृत संकेतस्थळ | अधिकृत संकेतस्थळ |
वर्तमान भरतीसाठी | क्लिक करा |
जाहिरात pdf :
परीक्षेचे स्वरूप: परीक्षा कलावती २ तास (१२० मिनिटे)

परीक्षेचे स्वरूप : परीक्षा ही ऑनलाईन (COMPUTER BASED TEST) पध्दतीने घेण्यात येईल परीक्षेच्या प्रश्नपपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील, प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक पशनास अधिकाधिक ०२ गुण ठेवण्यात येतील.
महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागा कडील शासन निर्णय क्र. प्रानिमं १२२२ प्र.क्र १४ का १३-अ दि. ४ मे २०२२ मधील तरतुदी नुसार गट ड (वर्ग-४) समकक्ष पदासाठी माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी) हि कमीत कमी अर्हता असल्याने सदर पदासाठी परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.) परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा माध्यमिक शालांत परीक्षेच्या (एस.एस.सी) च्या दर्जाच्या समान राहील व लेखी परीक्षेला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बोध्दीक चाचणी या विषयावर प्रश्ना करीता प्रत्येकी ५० गुण ठेवून एकूण २०० गुणांची ऑनलाईन (Computer Based Test) परीक्षा घेण्यात येईल.
शासन निर्णय, सामान्य प्रशासन शासन निर्णय क्र. प्रानिमं १२२२/प्र.क्र.५४/का १३-अ दि ४ मे २०२२ मधील तरतुदी नुसार या पदां करीता मौखिक परीक्षा (मुलाखती) घेण्यात येणार नाहीत.
उमेदवारांची निवडसूची तयार करणेसाठी शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र. एसआरव्ही-१०१७/प्र.क्र.३१/९८/१६-अ दि. १६/०३/१९९९ आणि शासन शुध्दीपत्रक सामान्य प्रशासन विभाग क्र.संकीर्ण ११९९/प्र.क्र.३९/१६ अ दि.१९/१२/२०१८ तसेच शासन निर्णय क्र. प्रानिमं १२२२/प्र.क्र.५४/का १३ दि ४ मे २०२२ अन्वये कार्यवाही करण्यात येईल.
शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रालिमं १२२२/प्र.क्र.५४/का.१३-अ दि. ४ मे २०२२ मधील तरतुदी नुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
परीक्षेचा निकाल (निवडसुची) तयार करतांना परीक्षेत ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांचा प्राधान्यक्रम हा महाराष्ट्र शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. प्रानिनं १२२२/प्र.क्र.५४/का.१३-अ दि. ४ मे २०२२ मध्ये नमुद निकषांच्या आधारे क्रमवार लावला जाईल.
परीक्षा ही Computer Based Test ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. सत्र १ ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व त्याची कठीणता तपासण्यात येऊन त्यावे समानीकरण करणेचे (Normalization) पध्दतीने गुणांक निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येईल (Normalization) TCS कंपनीकडून देण्यात आलेले सुत्र वेबसाईटवर माहितीसाठी प्रकाशित केलेला आहे. सदर (Normalization) सर्व परीक्षार्थी यांना बंधनकारक राहील याची सर्व परीक्षाची यांनी नोंद घ्यावी.
GMC Nanded Bharti 2025 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड येथे 86 पदांसाठी भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयन्त केला आहे. गट-ड (वर्ग 4) सर्व संवर्ग व गट-ड (वर्ग 4) प्रयोगशाळा परिचय ह्या 2 पदासाठी भरती होत आहे. 10 उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, अर्ज करण्यापूर्वी सर्वात प्रथम अधिकृत जाहिरात pdf हि काळजीपूर्वक वाचावी मगच अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2025 आहे तरीही इच्छुक व शैक्षणिक अर्हता धारण केलेले उमेदवारांनी लवकर विहित तारखेच्या आतमध्ये अर्ज सादर करावे.