जय जवान ,जय किसान ,जान देंगे… जमीन नही असा एल्गार करत शेतकरी एकवटला..!!
हिमायतनगर दि.१२ ऑगस्ट:सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाच्या विरोधात महाएल्गार सभेचे कामारी ता. हिमायतनगर येथे दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रविवार रोजी आयोजन करण्यात आले आहे यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समीती विदर्भ मराठवाडा चे अध्यक्ष .प्रल्हादराव जगताप पाटील कोषाध्यक्ष प्रल्हाद गावंडे , संघटक सचिव मुबारक तवर, डॉ. धरण विरोधी कार्यकर्ते बाबाराव डाखोरे ,विजय पाटील राऊत,.डॉ. सुप्रिया रमेशराव गावंडे ,.डॉ. शुभा बाबाराव डाखोरे यांच्यासह अनेक मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
तरी परिसरातील शेतकरी बांधवांनी सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाच्या विरोधातील लढा अजून तीव्र करण्यासाठी आणि हा अन्यायकारक प्रकल्प रद्द करण्यासाठी, दि.17 ऑगस्ट रोजी ठिक 12 वाजता कामारी येथे, संघर्ष समितीच्या महाएल्गार सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांच्या मते हे जलविद्युत प्रकल्प शेतकऱ्यांच्या हिताचा नसून परवडणारा नाही यवतमाळ व नांदेड या द़ोन जिल्ह्यातील सुपीकता असणारी जमीन आणि समृद्ध असलेली शेती तसेच भरपूर मोठ्या प्रमाणात असलेले जंगल त्यात अनेक वनस्पती आणि झाडे ही या धरणामुळे संकटात येतील आणि निसर्गाचे संतुलन बिघडेल त्याचबरोबर आपल्या दोन्ही जिल्ह्यांना फायदा कमी त्यामध्ये सर्वात जास्त फायदा हा तेलंगणा राज्याचा होणार आहे
हा प्रकल्प या भागातील शेतकऱ्यांना परवडणारा नाही जर सरकारला शेतकऱ्यांचे हित जोपायचे असेल तर गावोगावी उच्च प्रतीचे बंधारे उभारा आणि त्यामधून पाणी साठवा तसेच विद्युत निर्मिती करायचीच असेल तर प्रत्येक गावामध्ये गायरान आहेत गावठाण आहेत यांच्या जागा आहेत त्यामध्ये सोलार चे प्लांट उभे करा यामधून शेतकऱ्याचा जमिनीही जाणार नाहीत आणि शेती देखील वाचेल यासाठी बुडीत क्षेत्र असणाऱ्या गावच्या सरकारच्या विरोधात व धरणाच्या विरोधात शेतकऱ्या मोठ्या प्रमाणात विरोध दिसत आहे आणि विरोध नाही केला तर शेती तर जाईल पण त्याच बरोबर गावे देखील जातील धरणामध्ये कोणत्याही शेतकऱ्याचा फायदा होणार नाही त्यामध्ये उलट शेतकऱ्यांच्या जमीन पाण्याखाली जातील आणि शेतकरी देशोधडीला लागतील हीच सर्व शेतकऱ्यांची मागणी महाएल्गार मेळाव्यात असणार आहे..