आमदारांनी निवेदन स्वीकारून निधी त्वरित खर्च करण्याचे दिले आश्वासन
नांदेड दि.९ ऑगस्ट : आमदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गतचा दिव्यांगांसाठीचा दरवर्षीचा ३० लाख रुपये निधी खर्च व खासदार एम्पीलैड्स मधील दिव्यांगांचा दरवर्षीचा राखीव ३० लाख रुपये खर्च करण्यात आला नसल्यामुळे तसेच लोकसभा राज्यसभा विधानसभा विधानपरिषद यामध्ये दिव्यांगांसाठी कुठलेच प्रश्न उपस्थित करण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने 15 जुन पासुन माजी मुख्यमंत्री, खासदार आमदार यांच्या निवासस्थानासमोर अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलन सुरु करून लोकप्रतिनिधींचे लक्ष आपल्या मागण्यांकडे वेधून घेतले आहे. शनिवार दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी क्रांती दिनी आणि रक्षाबंधन दिनी सकल दिव्यांग संघटनेच्या आंदोलनाचा अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलनाचा सहावा टप्पा नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंद तिडके बोंढारकर यांच्या बोंढार येथील मतीमंद शाळा तथा कार्यालयावर धडकला.
केंद्र व राज्य शासनाचा दिव्यांगांचा वर्षाकाठीचा निधी आमदार खासदारांनी त्वरित खर्च करून दिव्यांगांना जगण्यासाठी बळ देऊन स्वतःच्या पायावर उभे टाकण्यासाठी शासनाचा निधी देऊन त्यांना उद्योग उभारून जीवन जगण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या निधीची गरज असते हा निधी खासदार आमदार खर्च करत नसल्यामुळे सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने मागील काही दिवसांपासून भीक मागून आंदोलन आमदार खासदार यांच्या घरापुढे करून सहाव्या टप्प्यातील आंदोलन दक्षिण मतदार संघाचे आमदार आनंद तिडके बोंढारकर यांच्या कार्यालयामुळे हजारो दिव्यांगाच्या वतीने करण्यात आले आमदाराने स्वतः निवेदन स्वीकारून दिव्यांगांसाठी निधी त्वरित खर्च करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.
मागील काही दिवसांपासून सकल दिव्यांग संघटना महाराष्ट्राच्या वतीने जिल्ह्यातील खासदार आमदारांच्या घरावर भीक मागून आंदोलन करून त्यांना जागा करण्याचं काम दिव्यांग संघटनेच्या वतीने करण्यात आले सहाव्या टप्प्यातील आंदोलन नांदेड दक्षिणचे आमदार आनंद तिडके बोंढारकर यांच्या बोंढार येथील कार्यालयापुढे करून दिव्यांगांनी विविध मागण्यांचे निवेदन आमदार बोंढारकर यांना दिले. त्यांनी ते स्वीकारून सर्व दिव्यांगांना आश्वासन देऊन दिव्यांगांसाठी जो काही निधी आहे त्यापेक्षा जास्त खर्च करण्याचे आश्वासन दिले.यावेळी महिला दिव्यांगांनी आमदार बोंढारकर यांना राख्या बांधून ओवाळणीच्या रूपात दरवर्षीचा 30 लाख रुपये खर्च करण्याची मागणी केली तसेच नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांना राखी बांधून माझे लाडके आमदार भाऊ आणि लाडके पोलीस भाऊ हा उपक्रम राबविला. यावेळी सकल दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे.व्यंकट कदम, रवि कोकरे,सय्यद आतिक हुसेन, सय्यद आरिफ, शिवा बंगरवार,शेख उमर,कार्तिक भरतीपुरम, नागनाथ कामजळगे, अजय गोरे, भोजराज शिंदे, लक्ष्मीकांत जाधव,माधव हिवराळे,शिवाजी सुर्यवंशी,मधुकर वाघमारे , सिद्धोधन गजभारे,नितीन पांचाळ,शेख आलीम,सईद वैद्य, सत्तेज वांगिकर,सिद्धार्थ लोखंडे, प्रकाश निल्लावार,अंकुलवार, मोहसिन कादरी, आनंद ढगे, नारायण तांडलवार.शेख सुफियान,शेख आल्लु, सुधीर गजभारे,
नागेश निरडी, राजु इराबत्तीन,धुमाळ,जोशी,
वैशाली आटकोरे,सरोजा निल्लावार,अफरोजा खानम, लोणेबाई, शेख जैनाज.भाग्यश्री नागेश्वर, कल्पना सकते, शकुंतलाबाई, सविता गवतेसह मुकबधीर कर्णबधिर व हिमोफिलीया दिव्यांगांसह शेकडो दिव्यांग बांधव उपस्थित होते.