मुंबई दि.१० जुलै: : बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती महाराष्ट्र,दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र यांच्या वतीने राज्य व केंद्र शासनाला वारंवार निवेदने देऊन आंदोलने उपोषणे करून मोर्चे काढुनही दिव्यांगांचा प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळे व महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने दिव्यांगांचा आमदार खासदार निधी योग्य रित्या खर्च केला जात नसल्यामुळे सकल दिव्यांग संघटना महाराष्ट्र राज्याकडून पावसाळी अधिवेशन विधानभवन मुंबई येथे हजारो दिव्यांगांच्या वतीने विधानभवनावर बुधवार दिनांक ९ जुलै २०२५ रोजी भव्य मोर्चा धडकला, यावेळी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त नांदेड शिवानंद मिनगिरे आणि मुंबई पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने शिष्टमंडळास दिव्यांग मंत्री अतुल सावे यांची भेट घडवली. प्रश्न मार्गी लावण्यासाठी आश्वासन दिले.
सविस्तर वृत्त असे की, बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य आणि दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने दिव्यांगांच्या प्रलंबित विविध मागण्यांसंदर्भात आजवर विविध शासकीय कार्यालयासमोर, मंत्र्यांच्या समोर. आमदार खासदार यांच्या घरासमोर यासह महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, दिव्यांग मंत्री यांना अनेकवेळा निवेदने देऊनही दिव्यांगांचे प्रश्न मार्गी लागले नसल्यामुळे नाईलाजास्तव सकल दिव्यांग संघटना महाराष्ट्राच्या वतीने पावसाळी अधिवेशन विधाभवन मुंबई येथे गनिमीकाव्याच्या माध्यमातून भव्य असा मोर्चा धडकला असता मुंबई पोलीसांनी हजारो दिव्यांगांना शिष्टमंडळासह ताब्यात घेऊन आझाद मैदानावर घेऊन गेले तेथे शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा करून नांदेड जिल्ह्याचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा दिव्यांग कल्याण विभाग अध्यक्ष अतुल सावे यांची भेट घडवली. या भेटीमध्ये दिव्यांग मंत्र्यांनी शिष्टमंडळाचे विविध मागण्यांचे निवेदन ज्यामध्ये आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधी रूपये ३० लक्ष दरवर्षी खर्च करण्यात यावा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील मानधन रूपये सहा हजार करण्यात यावे,
दिव्यांग व्यक्तींसाठीचे अधिनियम आरपीडब्ल्यु डी ॲक्ट २०१६ ची व महाराष्ट्र राज्य दिव्यांग धोरण २०१८ ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. बोगस दिव्यांग कर्मचारी, अधिकारी व शिक्षक यांची चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात यावे आणि ख-या दिव्यांगांना न्याय मिळवून द्यावा या व इतर अन्य मागण्यांचे निवेदन स्विकारून मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
या शिष्टमंडळात सकल दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहुल सिताराम साळवे. चंपतराव डाकोरे. आदित्य पाटील, नागनाथ कामजळगे, प्रेमसिंग चौहान, मोहम्मद सुफियान आदि होते तर आंदोलनात शिवाजी सुर्यवंशी,विष्णु जायभाये,व्यंकट कदम, सय्यद आरिफ, आतिक हुसेन, मोहम्मद मुबीन.राजु शेरकुरवार,भोजराज शिंदे, शंकर गिमेकार,मो.वसिम कादरी, नारायण नवले, शेख आलिम.दिगांबर लोणे, मुरलीधर जोगदंड.गणेश नवघडे, उमेश भगत, राजेश सुकळकर, बालाजी होनपारखे, गजानन पावडे, एकनाथ निरदुडे. जयसिंग पवार, मोहम्मद मोहसिन,
मो.सलिम पाशा कुरेशी,मारोती संभावाड.राहुल मुळे,पवळे,मोहमद आदींसह कमल फाऊंडेशनचे अध्यक्ष अमरदिप गोधने यासह हजारो दिव्यांगांची यावेळी उपस्थिती होती.
…… आझाद मैदानावर मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली असता सामंत यांनी दिव्यांगांच्या आंदोलनातील मागण्यांसंदर्भात दिव्यांग कल्याण आयुक्तांशी चर्चा करून मागण्या मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले.