आंदोलनाने तरोडा नाका ते मालेगाव रोड परीसर दणाणले
नांदेड दि.२९ जून
आमदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गतचा दिव्यांगांसाठीचा दरवर्षीचा 30 लक्ष रूपये निधी दरवर्षी खर्च करण्यात येत नसल्यामुळे तसेच संजय गांधी निराधार मानधन वाढविण्याच्या मागणीसह अधिवेशनात दिव्यांगांचे प्रश्न उपस्थित करत नसल्याच्या निषेधार्थ आज बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य, दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र राज्य आणि सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने आज तरोडा नाका परिसरातील आमदार हेमंत पाटील आणि मालेगाव रोड नांदेड येथील आमदार बालाजी कल्याणकर यांच्या निवासस्थानासमोर अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलन करण्यात आले. शेतकरी पुतळा ते आमदार बालाजी कल्याणकर आणि आमदार बालाजी कल्याणकर ते आमदार हेमंत पाटील यांच्या निवासस्थानासमोर हे अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलन करण्यात आले. पोलिस प्रशासनाकडून दोन्ही भागांमध्ये तगडा बंदोबस्त ठेवला होता.
आमदार बालाजी कल्याणकर यांनी आंदोलनकर्ते दिव्यांगांची भेट घेऊन निवेदन स्विकारले आणि उद्यापासून सुरु होत असलेल्या अधिवेशनात मी दिव्यांगांच्या हक्कासाठी आवाज उठविणार असल्याचे म्हणत आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतील दिव्यांगांचा निधी इतरत्र कुठेही न वळविता दरवर्षी खर्च करणार असल्याचे आश्वासन दिले आणि संजय गांधी निराधार मानधन वाढिसाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले. आमदार बालाजी कल्याणकर यांच्या आश्वासनानंतर आंदोलकांनी आपला मोर्चा आमदार हेमंत पाटील यांच्या घराकडे वळविला प्रचंड घोषणाबाजी आणि अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलनाने तरोडा नाका परीसर, मालेगाव रोड परीसर दणाणून गेले होते. या अर्धनग्न भीक मागो आंदोलनात नागरिकांनी १ रूपया, २ रूपये, ५ रूपये,१० रूपये,२० रूपये, ५० रूपये आणि १०० रूपये असे भरभरून दोन्ही आमदारांच्या नावावर भिक वाढली.
आमदार हेमंत पाटील हे उपस्थित नसल्यामुळे काहि काळ संतप्त दिव्यांगांनी आक्रोश व्यक्त करत आमच्या दिव्यांगांच्या प्रचारामुळेच पहिल्यांदा आमदार व नंतर प्रचारामुळेच खासदार होऊनही आमच्या हक्काचा निधी खर्च न केल्यामुळे खडेबोल सुनावले. आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहून भाग्यनगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी आमदार हेमंत पाटील यांच्याशी संपर्क साधुन हकिकत सांगितली असता आमदार हेमंत पाटील यांनी त्यांच्या वडिलांना आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन निवेदन स्विकारण्यास सांगितले तसेच प्रत्यक्ष फोन करून समस्त दिव्यांगांना आपण सकाळी साडेदहा वाजेपर्यंत आपली वाट बघीतली आणि उशीर होत असल्याने अधिवेशनात निघालो असल्याचे म्हणत दिलगीर व्यक्त केली असता दिव्यांगांनी आमच्या समस्या अधिवेशनात मांडण्याची विनंती केली अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कुठल्याच सत्ताधारी पक्षांच्या सभा होऊ देणार नसल्याची ठाम भूमिका मांडली. आमदार हेमंत पाटील यांनी सुद्धा आंदोलनकर्ते दिव्यांगांना आश्वासन दिले की अधिवेशनात मी आपल्या मागण्या संदर्भात आवाज उठविणार असल्याचे आश्वासन दिले आणि चहा फराळ अल्पआहार करूनच जावा अशी विनंती केली. आंदोलकांनी विनंतीला मान दिला आणि अशा प्रकारे आजचा दुसरा टप्पा पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने सकल दिव्यांग संघटनेचा पार पडला. या आंदोलनात दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहुल सिताराम साळवे, चंपतराव डाकोरे, आदित्य पाटील, व्यंकट कदम, सुनिल जाधव, शिवराज बंगरवार, संभाजी सोनाळे, शिवाजी सुर्यवंशी, पिंटुभाऊ राजेगोरे, प्रेमकुमार वैद्य,रवि कोकरे,प्रदिप हणवते, मिलिंद सितळे, शेख खालेद, माधव हिवराळे, सय्यद आतिक, बालाजी इप्तेवार आरळीकर, शेख गौस, कार्तिक कुमार भरतिपुरम, सय्यद आरिफ, किरणकुमार न्यालापल्ली, नारायण तांडलवार, शेख माजीद, बालाजी ढगे, मिटकर,सईद वैद्य मौलाना, शेख सादिक, शेख मतीन, भोजराज शिंदे, सुनिल कांबळे, शेख सुफियान, सिद्धोधन गजभारे, प्रशांत हणमंते, राजु इराबत्तीन, शेख आलीम, बालाजी ढगे, नवघडे, मिटकरे, भाग्यश्री नागेश्वर, अफरोजा खानम,कल्पना सकते,शेख जैनाज,लोणेबाई व मुकबधीर कर्णबधिर दिव्यांगांसह हजारो सकल दिव्यांग सहभागी झाले होते.