हिमायतनगर प्रतिनिधी | नांदेड: समाजातील न्याय, समता, बंधुता आणि प्रबोधन या मूल्यांच्या प्रसारासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावणार्या सामाजिक कार्यकर्त्यांना दिला जाणारा “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड” हा २०२६ या वर्षी हिमायतनगर तालुक्यातील मंगरूळ या छोट्याशा गावातील तरुण तडफदार लोकप्रतिनिधी मा. उपसरपंच संतोष आंबेकर याना जाहीर झाला आहे.
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या “समता, स्वातंत्र्य व बंधुता या महान तत्वांशी एकनिष्ठ राहुन समाजात अमुलाग्र बदल घडविण्याच्या प्रक्रियेत त्यांचे योगदान कौतुकास्पद असल्यामुळे दैनिक वीर शिरोमणी व नंदगिरीचा कानोसा यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार आम्ही देत आहोत. अशी प्रतिक्रिया मुख्य संपादक शंकरसिंह ठाकूर व मारोती शिकारे यांनी व्यक्त केली आहे.
या पुरस्काराची घोषणा होताच हिमायतनगर तालुक्यासह नांदेड जिल्हाभरातुन संतोष आंबेकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा हा पुरस्कार आमच्या छोट्याश्या गावातील तरूणाला मिळावा ही मंगरूळ वासियांसाठी अभिमानाची बाब आहे अशी भावना गावकरी व्यक्त करत आहेत. या पुरस्काराचे वितरण दिनांक १८ मे २०२६ रोजी नांदेड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.





















