ता. प्र. दत्तात्रय सज्जन
धर्माबाद दि.२४ जून :तालुक्यातील येताळा जिल्हा परिषदेत शाळा ही गता अनेक वर्षापासून शिक्षण क्षेत्रात अव्वल ठरत आलेली आहे.आज घडीला शाळेला १२५ वर्ष पूर्ण झाले,असून या शाळेत अनेक गोरगरीब शेतकरी मोलमजूरांची मुले शिक्षण घेत आहे. इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत असलेली ही शाळा सुज्जन इमारत स्वच्छ मैदान व सुंदर वृक्षांनी भरलेली व सर्व सोयसुद्धां उपलब्ध असलेली शाळा आहे.गत दोन-चार वर्षापासून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षका नंतर नवीन शिक्षकांची नियुक्तीच केली गेली नाही.
त्यामुळे आज रोजी या शाळेतील विद्यार्थ्यांनचे आयुष्य शिक्षणाविना धोक्यात आले आहे.माध्यमिक वर्गासाठी गणित,विज्ञान व सामाजिकशास्त्र या विषयासाठी शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचे अनोथान नुकसान होत आहे.यामुळे अनेक विद्यार्थी शाळा सोडून जाण्याचा मार्गावर असल्याने याच परिस्थितीची दखल घेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष अंबलगोंडे व गावचे सरपंच तुळशीराम यंगलोड यांनी थेट जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!