मुखेड प्रतिनिधी मुस्तफा पिंजारी
नांदेड दि११: मुखेड तालुक्यातील खतगाव पदे येथील शेतकऱ्याच्या शेळला भिषण आग लागून लाखों रुपयांचा शेतमाल जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना दि.११ एप्रिल रोजी सकाळी १० च्या सुमारास घडली आहे. तालुक्यातील मौजे खतगाव पदे येथील शेतकरी सुधाकर केशवराव भोसले यांनी गावाजवळच असलेल्या शेतात शेतमाल ठेवण्यासाठी बांधलेल्या पत्राचा शेडमध्ये दि.११ रोजी शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गावकऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच धावत जाऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला पण आग आटोक्यात न आल्याने गावकऱ्यांनी मुखेड येथील अग्निशमन दलाला पाचारण कले. अग्निशमन दलाने रौद्र रूप धारण केलेल्या आगीला आटोक्यात आणली मात्र यात शेतकऱ्याच्या २५ क्विंटल तुर,३० क्विंटल चना,१० क्विंटल ज्वारी,गुळी कुटी मशीन, पिठाची गिरणी व १० क्विंटल गव्हाने भरलेल्या बराच शेतमाल जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे वृत्त मिळाले आहे.ही आग कशामुळे लागली याची माहिती अद्यापही मिळालेली नाही.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड