नांदेड दि.३ नोव्हेंबर :नांदेड महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार कडून प्रभाग क्रमांक ११ हैदरबाग देगलूर नाका परिसर मधून फैसल सिद्दीकी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या काही वर्षांत विद्यार्थी, शेतकरी, युवक आणि नागरिकांच्या प्रश्नांवर सातत्याने भूमिका घेत सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करण्याचे काम त्यांनी केले आहे. सुशिक्षित, अभ्यासू आणि प्रशासनाशी बोलण्याची ताकद असलेले नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. देगलूर नाका परिसर हा नांदेडमधील वेगाने वाढणारा आणि मूळ सुविधा मागे पडलेल्या भागांपैकी एक आहे. या भागाला आता चांगले शिक्षण, दर्जेदार रस्ते, नियमित पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, युवकांसाठी रोजगार मार्गदर्शन आणि महिला सक्षमीकरण यांसाठी धडाडीचे, सुशिक्षित आणि पारदर्शक नेतृत्व आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत व्यक्त होत आहे आणि ते नेतृत्व फैसल सिद्दीकी यांच्या रूपाने उपलब्ध होत असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.
जनतेच्या हितासाठी त्यांनी वेगवेगळी कामे केलेली आहेत, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरद पवारचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असताना पूरग्रस्त विद्यार्थ्यांची शुल्क माफीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मराठी शाळा बंद करण्याच्या शासन निर्णयाविरोधात नांदेडमध्ये सर्वप्रथम निषेध व आंदोलनाची ठिणगी त्यांनी केली. विद्यापीठातील निकाल दुरुस्ती व वेळापत्रक सुधारणा यासाठी थेट पाठपुरावा करत असंख्य विद्यार्थ्यांचे काम त्यांनी केले. विद्यार्थी-पालक जागृती अभियान राबवून शैक्षणिक लूट रोखण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्यामुळे असंख्य पालकांना याचा फायदा झाला. भरती परीक्षेच्या शुल्कवाढी विरोधात निवेदन देऊन मुद्दा आ.रोहित पवार मार्फत विधानसभेपर्यंत त्यांनी पोहोचवला. तलाठी भरती परीक्षेत झालेल्या गोंधळानंतर पेपरफुटीसारखा कडक कायदा आणण्याची मागणी केली, त्यानंतर राज्य सरकारने कायदा अमलात आणला. नीट घोटाळ्याविरोधात नांदेडमधून सर्वात प्रथम त्यांनी आंदोलन करत निषेध केला. तीन वर्षांपासून प्रलंबित असलेली पेट परीक्षा घेण्यास विद्यापीठाला भाग पाडले, त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना न्याय मिळाला. कॉलेज प्रशासनाच्या दबावामुळे आत्महत्या करणार्या पुनीत वाटकर प्रकरणात प्रशासनावर दबाव आणून आरोपींवर गुन्हा दाखल करत त्याच्या कुटुंबाला न्याय मिळवून दिला. दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाची परीक्षा फॉर्म भरायची तारीख वाढवली. देगलूर नाका मालटेकडी परिसरासाठी अमृत योजनेअंतर्गत पाण्याची पाईपलाईन मंजूर करवून घेतली. देगलूर नाका भागातील वीज समस्यांवर दुर्लक्ष करणार्या सहाय्यक अभियंता यांच्या विरोधात उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार देत संबंधित अधिकार्यांची बदली सुनिश्चित केली.
या सर्व कामांमुळे प्रशासनावर त्यांची पकड, बोलण्याची ताकद आणि परिणामकारक नेतृत्व सिद्ध झालं आहे. नांदेड शहरात देगलूर नाका हा वेगाने वाढणारा, परंतु नियोजनशून्य विकासामुळे समस्या वाढत जाणारा परिसर आहे. कचरा व्यवस्थापन, पाणी, रस्ते, युवक उपक्रम, सार्वजनिक जागा, महिलांसाठी सुरक्षित व सोयीची सुविधा या सर्व प्रश्नांसाठी नागरिकांना वाचाळ नव्हे, तर काम करणारे नेतृत्व हवे आहे.
फैसल सिद्दीकी हे सुशिक्षित, अभ्यासू आणि लोकांसाठी उपलब्ध राहणारे व्यक्तिमत्व आहे. प्रशासनाला नेमक्या भाषेत, नेमक्या मुद्यावर बोलून काम करून घेण्याची क्षमता त्यांच्यात आहे. आता देगलूर नाक्याला अशाच नेतृत्वाची गरज आहे. विद्यार्थी संघटनेत काम करत असताना त्यांनी एवढ्या मोठ्या पातळीवर प्रश्न सोडवले, संविधानिक दडपण निर्माण केले, आंदोलने केली, शासन निर्णय मागे घ्यायला भाग पाडले तर ते नगरसेवक झाल्यानंतर विकासाची गती किती वाढेल याचा अंदाज स्वतःच येतो. त्यांना महाविकास आघाडीचा एकमुखी पाठिंबा आहे, असे दिसते. महाविकास आघाडीतील काही घटक पक्षांकडून प्रभाग ११ हैदराबागमध्ये फैसल सिद्दीकी यांना समर्थन मिळण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.