• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, April 8, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

दहावी-बारावी परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्काने अर्ज करण्यास 20 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
9 December 2023
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image 282369371 1702133543564
35
SHARES
232
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि. 9 :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी व उच्च माध्यमिक व इयत्ता बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना फॉर्म नंबर 17 भरुन खाजगी विद्यार्थी म्हणून परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

फेब्रुवारी-मार्च 2024 परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी म्हणून विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने अतिविलंब शुल्काने करण्यास बुधवार 20 डिसेंबर 2023 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. यापुर्वी अर्ज स्विकारण्याची मुदत 7 नोव्हेंबर पर्यंत निश्चित करण्यात आली होती. जे विद्यार्थी दिलेल्या या मुदतीत नावनोंदणी करु शकले नाही अशा विद्यार्थ्यांसाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने अतिविलंब शुल्काने सादर करावयाची सुविधा राज्य शिक्षण मंडळाकडून उपलब्ध करुन दिली आहे.

अतिविलंब शुल्कासह अंतिम मुदतवाढ कालावधी पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेला आहे. अतिविलंब शुल्क इयत्ता दहावी व बारावीसाठी प्रती विद्यार्थी प्रती दिन 20 रुपये स्विकारुन नावनोंदणी अर्ज सोमवार 11 डिसेंबर 2023 ते बुधवार 20 डिसेंबर 2023 या कालावधीत भरावयाचा आहे.

खाजगी विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी ते इयत्ता बारावीसाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्विकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पुढील संकेतस्थळाचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर मराठी / इंग्रजीमधून उपलब्ध आहेत. त्या वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी. संकेतस्थळ इयत्ता दहावीसाठी http://form17.mh-ssc.ac.in , इयत्ता बारावीसाठी http://form17.mh-hsc.ac.in हे आहे.

विद्यार्थ्यांने अर्ज भरण्याकरिता शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत) नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, स्वत:चा पासपोर्ट आकारातील फोटो स्वत:जवळ ठेवावा. ऑनलाईन अर्ज भरताना सदर कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावयाची आहेत. कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर/ मोबाईलद्वारे कागदपत्रांचे फोटो काढून ते अपलोड करावेत. विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे.

संपूर्ण अर्ज भरुन झाल्यावर भरलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्यांला त्याने अर्जात नमूद केलेल्या ई-मेल वर पाठविली जाणार आहे. तसेच या संपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंटआऊट, शुल्क पावती व हमीपत्र यासह दोन प्रतीत काढून घ्यावीत. विद्यार्थ्यांनी अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्का जमा केल्याबाबत पोच पावतीच्या दोन छायाप्रती व मुळ कागदपत्रे नावनोदणी अर्जावर नमूद केलेल्या मध्यामिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विहीत मुदतीत जमा करावयाची आहे.

खाजगी विद्यार्थ्यांसाठी नाव नोंदणी शुल्काचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे. इयत्ता दहावीसाठी 1 हजार रुपये नोंदणी शुल्क + 100 रुपये प्रक्रिया शुल्क + विलंब शुल्क / अतिविलंब शुल्क. तर इयत्ता बारावीसाठी 600 रुपये नोंदणी शुल्क + 100 रुपये प्रक्रिया शुल्क + विलंब शुल्क / अतिविलंब शुल्क राहिल.

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची नावनोंदणी ऑनलाईन होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यास त्यांच्या पत्त्यानुसार व त्याने निवडलेल्या माध्यम निहाय संपर्क केंद्राची यादी दिसेल. त्यापैकी विद्यार्थ्यांची पूर्वीची शाळा किंवा पत्त्यानुसार सर्वात जवळची माध्यमिक शाळेची निवड विद्यार्थ्यांने करावयाची आहे. या माध्यमिक शाळेने प्रकल्प, प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा, श्रेणी विषयासंदर्भातील कामकाज व अनुषंगिक मूल्यमापन करावयाचे आहे. याबाबत सर्व माध्यमिक शाळांना विभागीय मंडळांनी मार्गदर्शन करावे. या वर्षापासून संपर्क केंद्र पद्धत बंद करण्यात आली असल्याने मान्यताप्राप्त सर्व शाळांमधून खाजगी विद्यार्थी अर्ज स्विकारणे अनिवार्य आहे. याची सर्व मान्यताप्राप्त शाळांनी नोंद घ्यावी व उचित कार्यवाही करावी.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी ऑनलाईन करावयाची आहे. नावनोंदणी करताना विद्यार्थ्यांचा पत्ता व त्यांने निवडलेली शाखा व माध्यम निहाय त्यास कनिष्ठ महाविद्यालयाची यादी दिसेल. त्यामधील विद्यार्थ्यांची शाळा/कनिष्ठ महाविद्यालय किंवा पत्त्यानुसार सर्वात जवळच्या शाळेची/कनिष्ठ महाविद्यालयाची निवड विद्यार्थ्यांने करावयाची आहे. या कनिष्ठ महाविद्यालयाद्वारे परीक्षा अर्ज, प्रकल्प, प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी परीक्षा द्यावयाच्या आहेत. याबाबत सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना विभागीय मंडळांनी मार्गदर्शन करावे.

इयत्ता दहावी व बारावी फेब्रुवारी-मार्च 2024 खाजगी विद्यार्थी फॉर्म नं. 17 ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क ऑनलाईन पध्दतीने जसे डेबिट कार्ड, क्रिडिट कार्ड, युपीआय, नेट बँकिंगद्वारे भरणे अनिवार्य राहील. ऑनलाईन पध्दतीने शुल्क जमा केल्यानंतर विद्यार्थ्याला पोचपावती प्राप्त होईल. ही पोचपावती स्वत:कडे ठेवून त्याच्या दोन छायाप्रती माध्यमिक शाळेस/कनिष्ठ महाविद्यालयास देण्यात याव्यात. तसेच एकदा नाव नोंदणी अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव नाव नोंदणी शुल्क विद्यार्थ्यांला परत केले जाणार नाही. तसेच नाव नोंदणी अर्जात दुरुस्ती करावयाची ( उदा. माध्यम, शाखा, माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय अथवा अन्य कारणास्तव) असल्यास विद्यार्थ्यास पुन:श्च नाव नोंदणी शुल्क ऑनलाईन जमा करावे लागेल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

दिव्यांग विद्यार्थ्यांना खाजगीरित्या प्रविष्ट व्हायचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या / प्राधिकृत केलेल्या रुग्णालयाच्या प्रमाणपत्राची छायाप्रत प्रमाणित करुन अर्जासोबत सादर करावी व आवश्यकतेनुसार विभागीय मंडळ, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडून माहिती प्राप्त करुन घ्यावी. ऑनलाईन अर्ज भरतांना कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र. 020-25705207/25705208/25705271 वर संपर्क साधावा.

विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांनी अर्जासोबत छाननीसाठी दिलेली मूळ कागदपत्रे माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाकडून निर्धारित कालावधीनंतर परत घेऊन जाण्याची दक्षता घ्यावी. पात्र विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे मंडळाने विहीत केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. खाजगी विद्यार्थी अतिविलंब शुल्काने नाव नोंदणी करण्याकरीता अंतिम मुदत बुधवार 20 डिसेंबर 2023 असणार आहे. यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही यांवी सर्व संबंधितानी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाचे प्र. सचिव माणिक बांगर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

अर्धापुर व नांदेड ग्रामीण हद्दीतील सोन्याची बँग लिफ्टींग करणार्‍या आंतरराज्य टोळीतील एकास चार लाख तेवीस हजा रूपयांच्या मुद्देमालासह अटक

Next Post

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयद्वारा आयोजीत
विभागस्तरीय युवा महोत्सवात नांदेडचे वर्चस्व

Next Post
image editor output image1550819814 1702133822671

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयद्वारा आयोजीत
विभागस्तरीय युवा महोत्सवात नांदेडचे वर्चस्व

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी
.
#NandedCrime #Himayatnagar #CrimeAlert #SatyaprabhaNews #BreakingNews #LawAndOrder #NandedNewshttp://www.satyaprabhanews.com/himayatnagar-city-is-full-of-bloodshed-political-hatred/12263/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी.#NandedCrime #Himayatnagar #CrimeAlert #SatyaprabhaNews #BreakingNews
  • अनुश्री माने ही बिग बॉस मराठीची विजेती व्हावी. ती चांगली खेळते. तिच्यातले गुण, खेळण्याची समज आणि प्रामाणिकपणा यामुळे तिची वेगळी ओळख आहे. ती खऱ्या अर्थानं सन्मानचिन्हाची मानकरी आहे.
.
#SagarKarande #AnushriMane #BBM #SatyaprabhaNews #BiggBossMarathi
  • पाकिस्तानने इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध थांबवून पाकिस्तानने जगामध्ये शांततेचा संदेश दिला आहे. हे श्रेय आमच्या महाविश्वगुरुंना का मिळालं नाही? कारण महाविश्वगुरुंना कोणतीच भूमिकाच नाही. तिकडे जगात युद्ध सुरु आहे आणि आमचे महाविश्वगुरु पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू, येथे राजकीय विरोधकांवर तोंडातून बॉम्ब टाकत होते. - संजय राऊत, खासदार, शिवसेना ठाकरे गट#SanjayRaut #DonaldTrump #NarendraModi #Iran #SatyaprabhaNews
  • लोक काय म्हणतील या भितीने महिलांनी अन्याय सहन केलाय. आता महिला धाडसाने कुटुंबाला विश्वासात घेऊन पुढे येत आहेत. त्यामुळेच अशोक खरातविरुद्ध लैंगिक अत्याचाराचे आठ गुन्हे दाखल होऊ शकले.#SIT #TejaswiSatpute #AshokKharatCase #SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • अशोक खरात प्रकरणात आतापर्यंत 11 गुन्हे दाखल करण्यात आलेत. यापैकी महिला लैंगिक अत्याचार प्रकरणात 8 गुन्हे दाखल आहेत. महिलांनी दाखवलेल्या धाडसामुळे ही प्रकरणं उघडकीस आली आहेत. - तेजस्वी सातपुते, एसआयटी प्रमुख#AshokKharat #SIT #TejaswiSatpute #LatestNews #Nashik SatyaprabhaNews
  • अशोक खरात यांची पत्नी एकीकडे अटक पूर्व जामिनासाठी अर्ज करते, मात्र दुसरीकडे महाराष्ट्र पोलिसांना सापडत नाही याचे आश्चर्य आहे. -नाना पटोले, काँग्रेस नेते, आमदार #NanaPatole #AshokKharat #CrimeNews #SattaprabhaNews
  • आपल्या राज्याला राज्याचे मुख्यमंत्री किंवा केंद्रातले कोणी मंत्री असतील ते चालवत नाही, तर हे राज्य गुजरातचे लोक ते चालवतात. -नाना पटोले, काँग्रेस नेते, आमदार#NanaPatole #DevendraFadnavis  #maharashtra #SatyaprabhaNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10382
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8124
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6548
image editor output image372790316 1704806870229

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान
शाळांना मिळणार लाखोंची बक्षिसे

1002
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026
image editor output image515943228 1775235491127

खंडाळा देवी येथे हनुमान जयंतीनिमित्त पारंपरिक सोंगांचे आयोजन; उत्साहात साजरा झाला उत्सव

3 April 2026
IMG 20260402 WA0449

नासाच्या आर्टेमिस-२ मोहिमेत पळसपूर शाळेच्या विद्यार्थ्यांची नावे चंद्रावर

3 April 2026

Recent News

Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026
image editor output image515943228 1775235491127

खंडाळा देवी येथे हनुमान जयंतीनिमित्त पारंपरिक सोंगांचे आयोजन; उत्साहात साजरा झाला उत्सव

3 April 2026
IMG 20260402 WA0449

नासाच्या आर्टेमिस-२ मोहिमेत पळसपूर शाळेच्या विद्यार्थ्यांची नावे चंद्रावर

3 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज