
हिमायतनगर प्रतिनिधी/- शहरातील राजा भगीरथ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील प्राथमिक व उच्च माध्यमिकच्या विद्यार्थ्याच्या वतीने दि 23 जानेवारी रोजी स्वयंशासन दिनाचे आयोजन करण्यात आले होते या स्वयंशासन दिनाचा एक दिवसीय प्राचार्य म्हणून राजपुरोहित परमेश्वर तर उपप्राचार्य म्हणून कु. चिंतलवार मॅडम यांनी शाळेचे कामकाज पाहिले कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांनी विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाचे कथन केले.

या बाबत सविस्तर वृत्त असे की या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे पर्यवेक्षक कमलाकर दिक्कतवार सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. माने सर, प्रा. मुठेवार सर, पत्रकार अनिल भवरे सह पत्रकार नागेश शिंदे हे लाभले होते पर्यवेक्षक कमलाकर दिक्कतवार सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की यशस्वी जीवनाची पायाभरणी ही शालेय जीवनातूनच होते. नंतरच्या काळात उच्च शिक्षण घेताना निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवूनच पुढील वाटचाल विद्यार्थांनी केली पाहिजे शालेय जीवनातील विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिनातील सहभाग हा केवळ शिक्षक होण्याचा अनुभव देणारा नसून, भविष्याला आकार देणारी रूची, कला दर्शविणारे एक प्रतीक असते या स्वयंशासन दिनामध्ये मुख्याध्यापक, शिक्षक, लिपीक, सेवक व विद्यार्थी यांच्या तांत्रिक सुसंवादाची जाणीव निर्माण होते. स्वयंशासन हा एकदिवसीय अनुभव अन विद्यार्थ्यांचा आनंद वाढवणारा क्षण असतो विद्यार्थांना भविष्यात यशाची दिशादर्शक ठरतो म्हणून विद्यार्थ्यांनी ही आठवण आयुष्यभर जपली पाहिजे असे अनमोल मार्गदर्शन यावेळी केले त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रथमच शिक्षक म्हणून भूमिका पार पाडताना आपल्या जबाबदारीने संपूर्ण दिवसभर शाळा साभांळली त्यात प्राचार्य म्हणून राजपुरोहित परमेश्वर, उपप्राचार्य कु. चिंतलवार मॅडम व शिक्षक म्हणून गौरव शिरारपल्लू, पंढरीनाथ सूर्यवंशी , कु.गायत्री बसेटवार, शिवम निरटवार, कु. देशमुख मॅडम, कु. इतट्टेवार मॅडम, कु. तिमापुरे मॅडम, साईराज बनसोडे , कु.कलाने मॅडम, आदिबा शेख सह आदी विद्यार्थी विद्यार्थिनींनी दिवसभर राजा भगीरथ शाळेतील विद्यार्थांना अध्यापन केले व शालेय कामकाजाची पाहणी केली. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले अनुभव निरोपाच्या वेळी कथन केले यावेळी या स्वयंशासन दिनाचे परीक्षक म्हणून बेलदेवाड सर ,मिरजगावे सर यांनी काम पाहिले या कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन सगर सर यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस के जाधव व शेवटी आभार प्रदर्शन पतल्लेवार सर यांनी मानले