नांदेड दि.१० ऑक्टोबर : येथील ६५ वर्षीय रुग्ण दिगंबर दिगावे यांना तीव्र जळजळ मुंग्या येणे स्नायूची कमजोरी त्वचेखाली गाठ अशी लक्षणे मागील अनेक वर्षापासून होती त्यामुळे उपचारांसाठी त्यांनी यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथील तज्ञ डॉ. सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट सी एन श्रीकांत यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर त्यांना तपासणी आणती मेलिंगनंट पेरीफरल नर्व शीथ ट्युमर हा दुर्मिळ न्यूरोफिप्रोसार्कोमा कर्करोग आढळून आला.
पत्रकार परिषेदेत माहीती देतांना डॉ.सि.एन. श्रीकांत यांनी सांगितले की, मॅलिग्नंट पेरिफेरल नर्व्ह शीथ ट्यूमर (MPNST) जे परिधीय मज्जातंतूंच्या संरक्षणात्मक आवरणातून (ज्या मध्यवर्ती मज्जासंस्थेच्या बाहेर असतात) तयार होणारा कर्करोग आहे. हे न्यूरोफिब्रोसारकोमा किंवा मॅलिग्नंट श्वानोमा म्हणूनही ओळखले जातात आणि ते दुर्मिळ व घातक ट्यूमर आहेत. हे एक प्रकारचे मऊ ऊतकांचे (soft tissue) कर्करोग आहेत, जे मज्जातंतूंच्या आवरणामध्ये (sheath) तयार होतात. मॅलिग्नंट” म्हणजे कर्करोगाचा प्रकार, जो घातक असतो आणि शरीराच्या इतर भागांमध्ये पसरू शकतो, तर “नर्व्ह शीथ ट्यूमर” म्हणजे मज्जातंतूंच्या आवरणातून तयार होणारी गाठ (tumor) हा आहे
सदरील रुग्णांमध्ये ट्यूमरच्या ठिकाणी वेदना होणे (तीव्र, जळजळ किंवा मुंग्या आल्यासारखी).
शरीराच्या ज्या भागातील मज्जातंतूवर परिणाम झाला आहे, त्या भागात स्नायूंची कमजोरी जाणवणे.
त्वचेखाली वाढणारी एक गाठ किंवा सूज होती व ज्या भागात ट्यूमर आहे, तेथील संवेदनांमध्ये बदल होणे, जसे की बधिरता किंवा मुंग्या येणे हे लक्षणे होते तसेच ट्यूमरचा आकार वाढत राहतो.
जर हा ट्यूमर पोटाच्या भागात असेल तर पोटात दुखणे, उलट्या होणे किंवा वजन घटणे यांसारखी लक्षणे होती तपासणीनंतर शस्त्रक्रियेव्दारे १० सेमी आकाराचा ट्युमर बाहेर काढण्यात आला आणि रुग्णास जिवनदान दिले आहे
चौकट
डॉ.श्रीकांत यांच्या विषयी थोडक्यात
डॉक्टर सी एन श्रीकांत यांचे एमबीबीएस चे शिक्षण हे उस्मानिया मेडिकल कॉलेज हैदराबाद येथून झाले असून एम एस जनरल सर्जरी गांधी मेडिकल कॉलेज सिकंदराबाद येथे झाले आहे तर एमसीएच सर्जिकल ऑन कॉलॉजी मध्ये त्यांनी टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथे पदवी संपादन केली आहे. तसेच ते मागील बारा वर्षापासून यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथे आपली सेवा बजावत आहेत.
तसेच डॉक्टर सी एन श्रीकांत सर हे दर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी नांदेडला यशोदा इन्फॉर्मेशन सेंटर डॉक्टर लाइन येथे उपलब्ध असतात.
चौकट ः
यशोदा हॉस्पिटल करीता येथे करा संपर्क
यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद संदर्भातीलअ अधिक माहीतीसाठी जनसंपर्क अधिकारी श्री अनिल जोंधळे यांच्याशी 91549 95463 श्री किरण बंडे ९१५४१६७९९७ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे