यशोदा हॉस्पिटल हैदराबाद येथे गंभीर कॅन्सर रुग्णांना जिवनदान
लातूर दि.१३:थायमोमा आणि गुदव्दार कॅन्सर हे दुर्मिळ कर्करोग आहेत ज्यातील थायमोमा आपल्या थायमस नावाच्या ग्रंथीवर तयार होतात तर गुदव्दार कॅन्सर एक असामान्य विकार आहे सहसा या दोन्ही प्रकारच्या कॅन्सरमध्ये सुरुवातीला लक्षणे दिसून येत नाहीत परंतु जेव्हा लक्षणे दिसतात तेव्हा कॅन्सर हा बराच पुढच्या टप्प्यात गेलेला असतो त्यामुळे वयाच्या ४० नंतर प्रत्येकाने यशोदा हॉस्पिटल हैदराबाद येथे उपलब्ध असलेल्या कॅन्सर स्क्रिनिंग टेस्ट कराव्यात जेणेकरून कॅन्सरवर यशस्वीपणे मात करता येते असे प्रतिपादन यशोदा हॉस्पिटल हैदराबाद येथील सर्जिकल ऑनकॉलाजिस्ट (कर्करोग तज्ञ) डॉ. सचिन मर्दा यांनी पत्रकार परिषेदेत केले .
याविषयी पुढे माहीती देतांना त्यांनी सांगितले की, रुग्ण सौ.कामिनी तांडोरे या ६० वर्षीय महीला रुग्ण ह्या मागील दोन-अडीच वर्षापासून सततच्या खोकल्याने त्रस्त होत्या यावर त्यांनी लातूर सह आजूबाजूच्या जिल्हयातील अनेक डॉक्टरांकडे उपचार घेतले परंतु गुण येत नव्हता त्यामुळे लातूर येथील डॉक्टरांनी त्यांना हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटल येथे एकवेळेस तपासणी करण्याचा सल्ला दिला त्यानुसार त्यांच्या कुंटूबिंयानी आमच्याकडे उपचारासाठी आल्यानंतर तपासणीअंती थायमोमास हा गंभीर कॅन्सर आढळला होता.

थायमोमा या कॅन्सर मध्ये बहुतेक लोकांना सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे दिसत नाहीत. त्याऐवजी, जेव्हा ट्यूमर आपल्या छातीतील अवयवांवर परिणाम करतो तेव्हा लक्षणे उद्भवतात ज्यात वेदना आणि श्वासोच्छवासाच्या समस्या अशा प्रकारची लक्षणे समाविष्ट आहेत:
सौ.कालिंदा तोंडारे यांना ट्यूमर मुळे हृदयापर्यंत रक्त वाहून नेणाऱ्या मोठ्या नसांवर दाब निर्माण होऊन त्यांना सतत खोकला, धाप लागणे, थकवा , चक्कर येणे व जेवण करता न येणे अशा अनेक समस्या तयार झाल्या होत्या यावर कॅन्सर निदानानंतर डॉ.सचिन मर्दा व त्यांच्या टिमने सलग ७ तासाची शस्त्रक्रिया पार पाडत जवळपास १५ से.मी. आकाराचा टयुमर ऑपरेशनव्दारे बाहेर काढून रुग्णास जिवनदान दिले
गुदद्वाराचा कर्करोगावर उपचार ः
गुदद्वाराच्या कॅन्सर म्हणजेच कार्सिनोमा हा असामान्य प्रकारचा कर्करोग आहे जो तुमच्या गुदद्वाराच्या ऊतींमध्ये किंवा तुमच्या गुदद्वाराच्या कॅन्सरच्या अस्तरात विकसित होतो. सामान्य लक्षणे म्हणजे गुदद्वारातून रक्तस्त्राव होऊन गुदव्दार निकामी होते प्रस्तुत रुग्ण ७० वर्षीय सौ. चाटे यांना तिसरा टप्प्यातील कॅन्सरचे निदान झाले होते त्यावर कायमस्वरूपी कोलोस्टोमी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला होता ज्यात मल तुमच्या शरीरातून लटकवलेल्या बॅगव्दारे बाहेर पडू शकेल. कायमस्वरूपी कोलोस्टोमीसह जगणे आव्हानात्मक असू शकते,
यावर उपाय म्हणून डॉ. सचिन यांनी प्राथमिक तपासणीअंती दुबिर्णीद्वारे स्टिंकर प्रिझर्वेशन सर्जरी फॉर रेक्टल कॅन्सर ही आधुनिक सर्जरी करत त्यावर स्टेप्लर तंत्रज्ञानाने टाके घालून गुदव्दाराचा भाग पूर्ववत करण्यात आला मागील १० वर्षापासून सौ.चाटे या कॅन्सरमुक््त आयुष्य व्यतित करत आहेत .
चौकट
सर्जिकल ऑनकॉलाजिस्ट (कर्करोग तज्ञ) डॉ. सचिन मर्दा यांच्या विषयी
ऑन्कोलॉजी आणि कर्करोग काळजी क्षेत्रात त्यांचे उल्लेखनिय योगदान असून त्यांनी मागील १६ वर्षांहून अधिक काळात गंभीर कॅन्सर ग्रस्त असलेल्या १५००० पेक्षा अधिक रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडल्या आहेत यात अद्यायावत असे रोबोटिक आणि लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रियेतील अग्रगण्य तंत्रज्ञानासह केल्या आहेत दरम्यान त्यांनी आपल्या कारकिर्दीत हजारो रुग्णांना जिवनदान दिले आहे तसेच डॉ. सचिन यांची दर महीन्याच्या पहील्या बुधवारी नांदेड येथे व्हिजिट असते तरी गरजू रुग्णांनी व कॅन्सर ग्रस्तांनी याचा लाभ घ्यावा
चौकट
यशोदा हॉस्पिटल हैदराबाद येथील वैदयकीय मदतीबद्दल तेथील जनसंपर्क अधिकारी श्री राम देशमुख ७९९५५०४०२६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे













