नांदेड दि.२२ : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, आणि पुणे येथील अॅसपायर नॉलेज अॅण्ड स्किल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर आणि प्रा-कुलगुरु डॉ. अशोक महाजन यांच्या पुढाकारातून “मेगा जॉब फेअर – २०२५” चे आयोजन शनिवार, दि. ३० ऑगस्ट, २०२५ रोजी सकाळी ९ वाजता विद्यापीठ परिसरात करण्यात आले आहे.
या मेगा जॉब फेअरमध्ये अमॅझॉन, अरेस सॉफ्टवेअर, नेटविन इन्फोसोलुशन्स, टीम लिस डीजीटल, क्युस्ट क्रोप, पॉंईटमॅट्रीक्स, जेबीएल, गोदरेज, विनजीट टेक्नोलॉजीस यांसारख्या नामांकित कंपन्यांसह अनेक उद्योग सहभागी होणार आहेत. या सुवर्ण संधीचा फायदा सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांनी केले आहे.
दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर व पदव्युत्तर अशा सर्व स्तरावरील उमेदवारांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. जॉब फेअरमध्ये सहभागी होण्याकरिता उमेदवारांनी https://bit.ly/NANDEDJF या लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर कागदपत्रांची तपासणी होऊन प्रत्यक्ष मुलाखती पार पडणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम यादी त्यांनतर जाहीर केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडेटा, शैक्षणिक कागदपत्रे व ओळखपत्र घेऊन उपस्थित राहावे. या मेगा जॉब फेअरमुळे परिसरातील तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये करिअर घडविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!