नांदेड मूदखेड ता.प्रतिनिधी दि.१०: मुदखेड तालुक्यातून दररोज मोठ्या प्रमाणात वाळू माफिया आणि त्यांचे एजंट पूर्णपणे सक्रियता दर्शुवून गोदावरी नदीच्या काठी मुदखेड तालुक्यातील मुबलक साठा असलेल्या गावातून प्रत्येक दिवशी सकाळी आणि विशेष करून शनिवारी आणि रविवारी इतर तालुक्यांना वाळू वाहतूक करून महसूल प्रशासनाच्या यंत्रणेला स्पेशल दुर्लक्ष करून आपली न्याऱ्यी यारी करताना दिसत असल्याचे चित्र पाहावयास मिळते.

सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून दररोज वाळू माफिया आणि त्यांचे एजंट मुदखेड शहरातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौक येथे खूपच सकाळी आपले बस्थान मांडून आपल्या येणाऱ्या अवैध वाळूचे टीप्पर यांना शहरातून पुढे मार्गक्रमण करण्यासाठी कोणतही धोका नसल्याचे सूतोवाच करत काही जर अडचण निर्माण झाल्यास त्वरित संपर्क करून वाहतुकीचा मार्ग मोकळा करताना दिसत आल्याचे काही स्थनिकानी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आणि काही कमी दिवसांवर लोकसभेची निवडणूक आली असून परंतु अवैध वाळू माफिया ही संधी कशी सोप्या पने न सोडता काहीतरी करून गबाळ भरून घ्यावे अशी त्यांची इच्छा दिसत आणि कारण तहसील कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त वाळू माफिया अवैध वाहतूक करण्यात मस्त, शासनाचा लाखो रुपयांना भुर्दंड यास जबाबदार कोण हे संशोधन कारण योग्य असेल
#सत्यप्रभा न्युज #नांदेड