हदगाव हिमायतनगर विधानसभेत आमदार कोहळीकर यांच्या प्रयत्नातून हिमायतनगरात पाचवे मोफत सर्व रोग निदान शिबिर संपन्न मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबिरे ही काळाची गरज. हजारो रुग्णांनी घेतला या शिबिराचा लाभ.
हिमायतनगर दि.११: शिवसेना पक्षप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणी प्रमाणे ८०टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करण्याची लहानपणापासूनच आवड असल्याने हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात मागील एक वर्षापासून अविरतपणे मतदारसंघातील गोरगरीब रुग्णांच्या मदतीसाठी दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचलित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी यांच्या संयुक्त विद्यमाने हदगाव हिमायतनगर विधानसभेचे लोकप्रिय आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्यामार्फत सर्व रोग निदान व उपचार शिबिरे घेण्यात येत आहेत आज दिनांक ११ मे रोजी हिमायतनगर येथील श्री परमेश्वर देवस्थान येथे पाचवे मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केले यावेळी बोलताना त्यांनी असे सांगितले की अशी आरोग्य शिबिरे घेणे ही काळाची गरज आहे या शिबिराच्या माध्यमातून हजारो गरजू रुग्णांना लाभ मिळतो यातच मोठे समाधान आहे असे त्यांनी बोलताना सांगितले..
याबाबत सविस्तर वृत्त असे की आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आरोग्य सुविधा दिवसेंदिवस महागडी होत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना आपल्या आरोग्य समस्यांवर उपचार करून घेणे परवडत नाही. अनेक रुग्ण आजार पण आपल्या अंगावर काढतात. यासाठी वेळीच सर्वसामान्य रुग्णांची तपासणी करने गरजेचे आहे. त्यामुळे आजारपणाचे निदान लवकर झाल्यामुळे डॉक्टरांना उपचार करणे शक्य होते सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासविण्याचे काम हदगाव हिमायतनगर विधानसभेचे लोकप्रिय आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचलित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी यांच्या संयुक्त विद्यमाने दि ११ मे रोजी हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिर येथे मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरात मोठ्या संख्येने गरजू रुग्णांनी व नागरिकांनी सहभाग घेतला असल्याचे या शिबिरातून पाहायला मिळाले यावेळी श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महावीर शेठ श्रीश्रीमाळ ,शिवसेना जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, युवा सेना जिल्हाप्रमुख संदेश पाटील, महिला जिल्हाप्रमुख शितलताई भांगे, बबन पाटील कदम, विवेक कदम कोहळीकर, राजू पाटील, विजय वळसे, लांडगे मामा, विश्व हिंदू परिषदेचे श्यामजी रायेवार,अशोक पवार परोटीकर, गौरव पाटील, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गजानन आशिष भाऊ सकवान शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे भाजपा तालुका अध्यक्ष गजानन चायल, विलास वानखेडे, विनय देशमुख, युवा सेना तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर पुठेवार,रामभाऊ सुर्यवंशी, गजानन अनगुलवार, दिलीप ढोणे, सुनील चव्हाण, गजानन हारडपकर , सदाशिव सातव, फेरोज खुरेशी, ज्ञानेश्वर लिंगमपल्ले, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी मुनेश्वर, यांच्यासह अशा सेविका, वैद्यकीय कर्मचारी ,अधिकारी,पत्रकार व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड