तहसील कार्यालयाला चकरा मारून लाभार्थी परेशान त्वरित दिव्यांग निरांधाराचे मानधन खात्यात जमा करा अन्यथा संघटनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा राहुल साळवे
नांदेड दि.२० नोव्हेंबर:
हजारो दिव्यांग बांधवांना शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या माध्यमातून प्रति महिना मानधनाच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते परंतु मागील अनेक दिवसापासून व शासनाच्या आरटीजीएस अंतर्गत गोंधळामुळे दिव्यांग निराधारांचे मानधन अद्यापही खात्यात जमा झाले नसल्याने अनेक दिव्यांग निराधार हे तहसील कार्यालयामध्ये चकरा मारून परेशान होत आहेत. राज्य शासनाने त्वरित त्यांचा निधी जमा करावा अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी राज्य शासनाकडे निवेदन यादेऊन केला आहे.
सविस्तर वर्त असे की निराधार व दिव्यांगांना जगण्याचं बळ मिळावं त्यांना समाजामध्ये मान सन्मान मिळावा व त्यांचे जीवनमान उंचावावे या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाते. ती आर्थिक मदत वेळेवर न देता अद्याप २० नोव्हेंबर आली तरी त्यांच्या खात्यात जमा झाली नसल्याने अनेक दिव्यांग व निराधार ते मानधन मिळावे म्हणून तहसील कार्यालयामध्ये चकरा मारून अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत परंतु अधिकाऱ्यांच्या हातात काहीच नसल्यामुळे त्यांनी संबंधित राज्य शासनाकडेच निधी असून त्यांनी आरटीजीएस अंतर्गत प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये टाकला जात असल्याचे उत्तर दिव्यांग निराधार यांना देत आहेत परंतु दिव्यांग निराधार यांचे खाते अद्यापही रिकामीच असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. त्यामुळे राज्य शासनाने त्वरित दिव्यांगांचे आर्थिक मानधन त्यांच्या खात्यात जमा करावे अन्यथा बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीच्या वतीने ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनी आक्रोश मोर्चा काढुन तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने अध्यक्ष राहुल साळवे यांनी राज्य शासनाला दिला आहे.












