विनापरवाना फटाका विक्रीला सुरुवात ? फटाका बाजारासाठी नियम धाब्यावर ?
नांदेड दि.१२ ऑक्टोबर : फटाके विक्री करण्यासाठी घालून देण्यात आलेल्या नियमांची यादी बघितल्यास विक्रेत्यांच्या असोशिएनेच त्यातील सर्वच नियमांकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केल्याचे सध्या पाहावयास मिळत आहे तर फटाका व्यापाऱ्यांनीच फटाका मार्केट दोन ठिकाणी लावण्याची परवानगी मिळवून एका ठिकाणी ३० तर दुसऱ्या ठिकाणी ५० दुकानं थाटण्याचा घाट घातला असल्याचे चित्र दिसून येत आहे
मागील कित्येक वर्षापासून सुरू असलेल्या परंपरेनुसार फटाक्यांच्या स्टॉल मांडणीपासूनच नागरिकांच्या सुरक्षिततेकडे कानाडोळा करण्याची सुरूवात महापालिका आणि अग्निशामक दलानेही केली असून न्यायालयाचे निर्देश व महाराष्ट्र शासनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसत असूनही कारवाई होत नसल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे यावर्षीही नियमांची पायमल्ली झाल्याचे दिसून येत आहे
फटाका नियम निकष पायदळी..?
महापालिकेने परवानगी दिलेल्या फटाके विक्रेत्यांसाठी न्यायालय आणि शासनाकडून वेगवेगळ्या अटी व शर्ती आहेत परंतु कागदपत्री एक नकाशा दाखवून दुसऱ्याच आकाराचे दुकाने थाटल्याचे दिसून येत असून सर्व फटाका दुकानदारांसाठी सारखेच नियम असतांना काही दुकाने मोठी तर काही दुकाने लहान असे कसे काय ?
एकंदरीत अशी चर्चा ऐकीवात आहे की, सरकारकडून परवानगी ३० दुकांनाची आणि मांडणी ५० दुकांनाची असे कसे होऊ शकते यावर प्रशासनाने त्वरीत लक्ष घालून संबधित दोषी व्यापाऱ्यांवर काही दुर्घटना होण्या अगोदरच जिल्हाधिकारी यांनी कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे
फटाका मार्केट जोमात प्रशासन कोमात..!
फटाका विक्रेता मार्केट साठी असलेल्या परवानग्या अजूनही निघाल्या नाहीत फक्त दुकानाची बोली लागून मार्केट स्थापन करण्यासाठी तयारी प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे परंतु काही अतिउत्साही व्यापाऱ्यांनी परवानगीच्या अगोदरच प्रत्यक्षात फटाका विक्रीला सुरुवात करून एक प्रकारे प्रशासनालाच आव्हान दिल्याचे चित्र नांदेडत निर्माण झाले आहे
चौकट
दुकान दहा बाय पंधरा चे पण प्रत्यक्षात किती मोठे..?
फटाका संहितेच्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या नियमावलीत १० बाय १५ चे दुकाना असायला पाहिजे परंतु प्रत्यक्षात मोठमोठे शेड मारून फटका विक्रीला सुरुवात झाल्याचे दिसून येत असून यासह या भागात जारी करण्यात आलेल्या नियमावलीचेही उल्लंघन मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे परवानगी अगोदरच फटाका विक्रीला सुरुवात होऊन अनेक परवाना नसलेले फटाके ही विक्रीला ठेवण्यात आल्या असल्याचे दिसून येत आहे
एका ठिकाणी केंद्रीत असलेले मार्केट दोन ठिकाणी विस्थापित झाले असले तरी नियमांची पायमल्ली होऊन दुर्घटनेला आमंत्रण दिले जात असल्याने या प्रकारावर कारवाईची मागणीच काही सामाजिक संघटना आणि फटाका विक्रेतेच महापालिकेकडे व जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असल्याची चर्चा ऐकावयास येत आहे